महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पेट्रोल पंपासमोरच 'बर्निंग कार'चा थरार - चारचाकी

अकोल्यातील तेल्हारा शहरात पेट्रोल पंपासमोरच धावत्या चारचाकीने पेट घेतला.

बर्निंग कार
बर्निंग कार

By

Published : Jan 30, 2020, 3:43 PM IST

अकोला- तेल्हारा शहरात एका धावत्या चारचाकीने मंगळवारी (दि. 28 जानेवारी) रात्री पेट्रोल पंपासमोर पेट घेतला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांची एकच धांदल उडाली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घरनास्थळी दाखल झाले. पण, तोपर्यंत चारचाकी जळून खाक झाली होती. ही घटना तेल्हारा शहरातील केवलराम पेट्रोल पंपासमोर घडली.

पेट्रोल पंपासमोरच 'बर्निंग कार'चा थरार

पेट्रोल पंपासमोरून चारचाकी वाहनाने (एम एच 30 एल 8817) धावताना अचानक पेट घेतला. आग लागल्याचे वेळीच चालकाच्या लक्षात आल्याने लागलीच त्याने वाहन रस्त्याच्या बाजुला नेली. त्यामुळे जीवितहानी टळली.

हेही वाचा - 'बंददरम्यान झालेल्या घटनांवेळी पोलिसांची भूमिका बघ्याची'

ABOUT THE AUTHOR

...view details