अकोला - मोठ्या उद्योगात मोठ्या अडचणी त्यासोबतच नवीन तंत्रज्ञानही निर्माण होत असतात. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अनेक उद्योग समूह यश प्राप्त करीत आहे. त्यामुळे उद्योगात होणारे हे बदल आपण लवकर स्वीकारत नसल्यामुळे अनेक उद्योग प्रगती करु शकत नसल्याची खंत केंद्रीय मानव संसाधन विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी व्यक्त केली. अकोला इंडस्ट्रीज असोसिएशन यांच्यातर्फे अॅग्रो इंडस्ट्रीयल आणि फूड टेक मिशनरी 2020 च्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
उद्योगांनी नवीन तंत्रज्ञान स्वीकारणे आवश्यक - केंद्रीय राज्यमंत्री धोत्रे हेही वाचा -अकोला जिल्हा परिषदेत भारिपने राखला गड; भाजपचा दारूण पराभव
धोत्रे म्हणाले की, कोणतेही बदल आपण लवकर स्वीकारत नाहीत. सध्या स्पर्धा वाढली आहे. संपूर्ण जगभर व्यापार झाला आहे. हे विश्व ग्लोबल व्हिलेज झाले आहे. नवीन पिढीत अनेक नवीन शब्द आले आहेत. बऱ्याच गोष्टी अशा आहेत, की सर्वच कामे आपण करायला गेलो तर ते शक्य नाही. प्रत्येक क्षेत्रात किंवा उद्योगात माहिती व तंत्रज्ञान हे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. आजच्या घडीला पोस्टल बँक खाते अवघ्या तीन मिनिटात खाते उघडू शकता. काही वर्षांपूर्वी या गोष्टी या कठीण वाटत होत्या. तंत्रज्ञान असले तरी आपली मेहनत आणि आपला प्रामाणिकपणा याचा उपयोग होत आहे, असेही यांनी सांगितले.
हेही वाचा -अटीतटीच्या लढतीत भारीपचे महासचिव सुलताने विजयी
या कार्यक्रमासाठी आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, असोसिएशनचे अध्यक्ष उन्मेश मालू, मनोज खंडेलवाल, नरेश बियाणी, नितीन बियाणी, निखिल अग्रवाल, आशिष खंडेलवाल, विष्णू खंडेलवाल, रितेश गुप्ता, अमित सराफ यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.