महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीएसएनएलच्या इंटरनेट सेवा बंद; शासकीय कार्यालयातील ऑनलाईन कामे खोळंबली - News about BSNL internet service

अकोला शहरात बीएसएनएलची इंटरनेट सेवा 27 जानेवारीपासून बंद झाली आहे. यामुळे शासकीय कार्यालयातील ऑनलाईन कामे खोळंबली आहेत.

BSNL's internet service in Akola has been shut down
बीएसएनएलच्या इंटरनेट सेवा बंद; शासकीय कार्यालयातील ऑनलाईन कामे खोळंबली

By

Published : Jan 28, 2021, 7:18 PM IST

अकोला -बीएसएनएल इंटरनेट सेवा 27 जानेवारीपासून बंद असल्यामुळे शासकीय कार्यालयातील कामे खोळंबली आहेत. ही परिस्थिती दुसऱ्या दिवशी जैसे थे असल्याने शासकीय कार्यालयातील ऑनलाईन कामे होऊ शकली नाहीत. परिणामी, काही कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलमधील हॉटस्पॉट किंवा खाजगी वायफाय वापरून तातडीची कामे नेटच्या कमी स्पीड वर करून घेतली आहेत. दरम्यान बीएसएनएलचे अधिकारी यासंदर्भात नागपूर येथून अडचण असल्याचे सांगत आहेत.

बीएसएनएलच्या इंटरनेट सेवा बंद; शासकीय कार्यालयातील ऑनलाईन कामे खोळंबली

बीएसएनएल ग्राहकांना इंटरनेट सेवा 27 जानेवारीपासून मिळत नसल्यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, शासकीय कार्यालयात बीएसएनएलचे कनेक्शन देण्यात आले असल्यामुळे येथील कामकाज बीएसएनएलच्या ब्रडबँडवर पूर्णपणे अवलंबून आहे. त्यासोबतच विशेष इंटरनेट सेवा देणारी व्यवस्था सरकारी कार्यालयांमध्ये दिली आहे. मात्र, या दोन्ही व्यवस्था शासकीय कार्यालयात निरुपयोगी ठरत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून शासकीय कार्यालयांमधील बीएसएनएलची इंटरनेट सेवा बंद असल्याने येथील कामकाज खोळंबले आहे. याचा त्रास नागरिकांना होत आहे.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात तर इंटरनेट सेवा बंद असल्यामुळे कुठलीच कामे झालेली नाहीत. वाहन रजिस्टर करणे, उमेदवारांची परीक्षा घेणे यासह अति महत्त्वाची कामे येथे होऊ शकत नाहीत. परिणामी नवीन परवाना काढण्यासाठी आलेल्या उमेदवारांचा हिरमोड झाला असून त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे आरटीओ कार्यालयातील अधिकार्‍यांनी स्वतःच्या मोबाईलमधील हॉटस्पॉट वापरून किंवा दुसऱ्या कंपनीचा इंटरनेट वाय-फाय वापरून इंटरनेट सेवा उपलब्ध करून घेतली असून तिथे येणाऱ्या नागरिकांचे काम वेगाने नव्हे तर थोड्याफार प्रमाणात होत आहेत.

बीएसएनएलची इंटरनेट सेवा ही नागपूर येथून विस्कळीत झालेले आहे. ही सेवा पूर्ववत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. ग्राहकांना ही सेवा लवकरच मिळेल, अशी अपेक्षा आहे. असे बीएसएनएल विभागीय अधिकारी रमेश धांडे म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details