अकोला :स्थावर मालमत्तेच्या कारणावरुन (Akola murder case) एका ५० वर्षीय व्यक्तीची मुख्य चौकातील नगर परिषद कार्यालयाजवळ शनिवारी रात्री हत्या (brother of wife murder) केली. या घटनेमध्ये जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शेख गफ्फार शेख मुनाफ असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सय्यद आसिफ सय्यद उमर असे आरोपीचे नाव आहे. (murder due to property dispute) (Akola Crime)
लाकडी फळीने वार-शहरातील कासारखेड परिसरातील शेख गफार शेख मुनाफ हे आठवडी बाजारात भाजीपाला घेत असताना नगर परिषदेच्यासमोर आरोपीने लाकडी फडीने त्यांच्या डोक्यावर वार केला. ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना त्यांना कोणीही मदत केली नाही. त्यामुळे जखमी अवस्थेत अतिरिक्त स्त्राव झाल्याने ग्रामीण रुग्णालयात उपचारापूर्वी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान पोलिसांनी मृतकाचा बहीण जावई सय्यद आसिफ सय्यद उमर यास रात्री अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.