अकोला- भाजीपाल्याच्या हिशोबाच्या कारणावरून झालेल्या वादातून एका दलालाने विक्रेत्यावर हल्ला केल्याची घटना आज जनता भाजीबाजारात घडली. पांडुरंग किसन केदार असे जखमी विक्रेत्याचे नाव असून हनुमंत डाहे असे हल्ला करणाऱ्या दलालाचे नाव आहे.
अकोल्यात हिशोबाच्या कारणावरून दलालाचा विक्रेत्यावर चाकू हल्ला - HANUMANT DAHE
पांडुरंग किसन केदार असे जखमी विक्रेत्यांचे नाव असून हुनमंत डाहे असे हल्ला करणाऱ्या दलालांचे नाव आहे.
पांडुरंग किसन केदार हे मुलगा शुभमसोबत दुकानात आले. यावेळी दलाल हनुमंत डाहे हाही तिथे आला. त्याला पांडुरंग केदार यांनी हिशोबाचे आधीचे एक हजार शंभर रुपये आणि आजचे 450 रुपये असे एकूण एक हजार 520 रुपये मागितले. त्यावर या दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला जात असल्याचे पाहुन हनुमंत डाहे याने जवळच असलेला चाकू उचलून पांडुरंग केदार यांच्यावर हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. यावेळी उपस्थित असलेला त्यांचा मुलगा शुभम आणि शेजारील व्यक्तीने मध्यस्थी करून हे प्रकरण मिटवले. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी हनुमंत डाहे हा फरार आहे.