अकोला - पातुर नगरपरिषदेच्या रेकॉर्ड रुमला गुरुवारी रात्री आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये महत्त्वाची कागदपत्रे जळाली असून, मोठे नुकसान झाले आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले होते.
पातुर नगरपरिषदेच्या रेकॉर्ड रुमला आग, महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक - पातुर नगरपरिषदेच्या रेकॉर्ड रुमला आग
पातुर नगरपरिषदेच्या रेकॉर्ड रुमला गुरुवारी रात्री आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये महत्त्वाची कागदपत्रे जळाली असून, मोठे नुकसान झाले आहे.
पातुर नगर परिषदेमध्ये असलेल्या रेकॉर्ड रूममध्ये महत्त्वाची कागदपत्रे आहेत. या कागदपत्रांना अचानकपणे आग लागली. ही आग नेमकी कशामुळे लागले याचे कारण अद्याप समजू शकले नाही. दरम्यान, आगीत रेकॉर्ड रूममधील सगळी कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. या आगीमुळे दुसऱ्या कुठल्या विभागाची हाणी झाली नाही. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले होते. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचा शोध अग्निशमन दल आणि पोलीस घेत आहेत.