महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तळेगाव-पातुर्डात मुसळधार पाऊस; गौतमा नदीवरील पर्यायी पूल गेला वाहून - गौतमा नदीवरील पूल गेला वाहून

मान्सून राज्यात सक्रीय झाला आहे. गेल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सध्या खरीप हंगामाच्या पेरणीची लगबग सुरू आहे. मात्र, शनिवारी तालुक्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे जमीनीला वापला येण्यासाठी शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग सध्या चिंतेत आहे.

rainfall
तळेगाव-पातुर्डात मुसळधार पाऊस; गौतमा नदीवरील पर्यायी पूल गेला वाहून

By

Published : Jun 28, 2020, 2:24 PM IST

अकोला- तेल्हारा तालुक्यातील सर्वात मोठा असलेल्या पुलाचे काम तळेगाव-पातुर्डा येथील गौतमा नदीवर सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यायी पूल उभारण्यात आला होता. मात्र शनिवारी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गौतमा नदीला पूर आला. या पुराच्या पाण्यामुळे या नदीवरील पर्यायी पूल वाहून गेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे तळेगाव-पातुर्डा या मार्गावरील तब्बल १५ गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच या मुसळधार पावसामुळे खरीप हंगाम मागास होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तळेगाव-पातुर्डात मुसळधार पाऊस; गौतमा नदीवरील पर्यायी पूल गेला वाहून

मान्सून राज्यात सक्रीय झाला आहे. गेल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यातच कोरोनाच्या संकटात लॉकडाऊन आल्याने गौतमा नदीवरील पुलाचे काम बंद पडले. मध्य प्रदेशातील मजूर गावी निघून गेल्याने काम गेल्या तीन महिन्यापासून पुलाचे काम बंद आहे. त्यातच नदीपात्रातून पर्यायी केलेला रस्ता पावसाने वाहून गेला. गौतमा नदीवरील पूल बांधण्याचे काम कासवगतीने होत असल्याने आणि पर्यायी पूल वाहून गेल्याने १५ गावांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

सध्या खरीप हंगामाच्या पेरणीची लगबग सुरू आहे. मात्र, शनिवारी तालुक्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे जमीनीला वापला येण्यासाठी शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग सध्या चिंतेत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details