अकोला-आईसोबत पायी जाणाऱ्या मुलाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर भर रस्त्यात दगडाने ठेचून आईचा खून केल्याची घटना आज सायंकाळी बोरगाव मंजू जवळील नवीन महामार्गाजवळ घडली. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले असून हत्येमागील नेमके कारण कळू शकले नाही. शशिकला तुकाराम येवले असे मृत महिलेचे नाव आहे. तर अमोल तुकाराम येवले असे आरोपीचे नाव आहे.
मुलाकडून जन्मदात्या आईचा महामार्गावर दगडाने ठेचून खून; अकोला जिल्ह्यातील घटना - akola mother murder
पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले असून हत्येमागील नेमके कारण कळू शकले नाही. शशिकला तुकाराम येवले, असे मृत महिलेचे नाव आहे.
![मुलाकडून जन्मदात्या आईचा महामार्गावर दगडाने ठेचून खून; अकोला जिल्ह्यातील घटना Police inspecting the scene](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-07:31-mh-akl-05-mother-murder-7205458-31052020191138-3105f-1590932498-900.jpg)
बोरगाव मंजू वरून मूर्तिजापूरकडे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरून मायलेक पायी जात होते. गावापासून थोडे दूर अंतरावर आल्यानंतर मुलगा अमोल तुकाराम येवले याने त्याची आई शशिकला तुकाराम येवले हिला भर रस्त्यात मारहाण केली. त्यानंतर तिला खाली पाडून तिच्या चेहऱ्यावर दगडाने वार केले. यामध्ये त्या जागीच ठार झाल्या.
घटनेची माहिती माहितीच बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मारेकरी मुलगा अमोल यास ताब्यात घेतले आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. घटनेचा तपास बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे ठाणेदार हरीश गवळी करीत आहेत.