महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपच्या सरकारला देशातील लोक किड्यामुंग्यांसारखी वाटतात - प्रकाश आंबेडकर - prakash ambedkar press conference news

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर निशाणा साधला. भाजपच्या सरकारला देशातील लोक किड्यामुंग्यांसारखी वाटतात, असा आरोप त्यांनी केला.

prakash ambedkar press conference news
भाजपच्या सरकारला देशातील लोक किड्यामुंग्यांसारखी वाटतात - प्रकाश आंबेडकर

By

Published : Apr 20, 2021, 9:18 PM IST

अकोला -राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत निशाणा साधला. भाजपच्या सरकारला देशातील लोक किड्यामुंग्यांसारखी वाटतात, असा आरोप त्यांनी केला. जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

प्रतिक्रिया

मोदी सरकार जनेतला किड्यामुंग्यांसारखी समजते -

देवेंद्र फडणवीस हे पोलीस ठाण्यात कशासाठी जातात हे स्पष्ट आहे. एका कंपनीचा डायरेक्टर हा रेमडीसिवीर इंजेक्शन निर्यात करीत होते. ही माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी तिथे रेड केली आणि निर्यात होणारी औषध थांबविली. ते सोडवण्यासाठी भाजप पुढे गेली असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज केला. भारतातील माणसं ही भारतीय जनता पक्षाच्या सरकारला किड्यामुंग्यांसारखी वाटतात. त्यांना जीवाची किंमत नाही, असा आरोप त्यांनी केला. तसेच आतापर्यंत सरकारने कोविडची कोणती औषध कोणकोणत्या देशात आणि किती प्रमाणात पाठविली, याचा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावा, असे आवाहनही त्यांनी केले. शॉर्ट मार्केट असल्याचे सांगून इथल्या लोक चोर आहेत, असे दाखविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेची ते म्हणाले.

हेही वाचा - 'केंद्राने सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडले, राज्य सरकारने सोडू नये'

ABOUT THE AUTHOR

...view details