महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिवाळीचे कपडे घेण्यासाठी एकाच मोटरसायकलवरून निघालेले सहा जण अपघातात गंभीर जखमी - motorcycle accident akola 6 injured

पातुर येथून अकोला येथे दिवाळीचे कपडे खरेदी करण्यासाठी चार लहान मुलांना दोघेजण असे एकूण सहाजण एकाच मोटर सायकल वरून प्रवास करीत होते. शिरला बुद्धभूमी जवळ समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एकाच मोटरसायकलवरील सर्वच्या सर्व सहाजण रस्त्यावर जखमी अवस्थेत पडले. त्या सर्वांना प्रत्यक्षदर्शींनी समोरच्या लिंबाच्या झाडाखाली आणून ठेवले.

motocycle accident akola
मोटरसायकल अपघात अकोला

By

Published : Nov 13, 2020, 10:36 PM IST

अकोला -दिवाळीचे कपडे खरेदी करण्यासाठी एकाच मोटरसायकलवरून अकोला निघालेल्या सहा जणांच्या मोटर सायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातातील तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अकोला पातुर महामार्गावरील शिर्ला बुद्धभूमी समोर हा अपघात झाला.

काय आहे घटना?

पातुर येथून अकोला येथे दिवाळीचे कपडे खरेदी करण्यासाठी चार लहान मुलांना दोघेजण असे एकूण सहाजण एकाच मोटर सायकल वरून प्रवास करीत होते. शिरला बुद्धभूमी जवळ समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एकाच मोटरसायकलवरील सर्वच्या सर्व सहाजण रस्त्यावर जखमी अवस्थेत पडले. त्या सर्वांना प्रत्यक्षदर्शींनी समोरच्या लिंबाच्या झाडाखाली आणून ठेवले. या अपघातातील सहा जण जवळजवळ 40 मिनिट जागेवर विव्हळत पडले होते. मात्र, त्या ठिकाणी वेळेवर शासकीय रुग्णवाहिका पोहोचली नाही. त्यामुळे पातुर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुरेंद्र राऊत, दुलेखा युसुफखा, अर्जुन लसनकार, ऐहफाजुद्दीन नगरसेवक, परसराम देवकर आदींनी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना अडवून जखमींना अकोला सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ पाठवण्यात आले.

हेही वाचा -कोंडाईबारी घाटात ट्रकच्या धडकेत पुलावरून कार कोसळली; तीन जागीच ठार, दोघे गंभीर

जखमींमध्ये शेखर बाप्पू भोसले, खाबूतर पवार, यशा खाबुतर पावर, मंगेश चव्हाण, संजना शंकर भोसले, बेबिका भोसले (सर्व रा. पातुर) याचा समावेश आहे. तर यातील तीन जण गंभीर असल्याची माहिती आहे.

क्षमतेपेक्षा जास्त जण एकाच दुचाकीवर -

एकाच मोटरसायकलवरून अकोला येथे तब्बल सहा जण प्रवास करीत होते. त्यामुळे क्षमतेपेक्षा अधिक एकाच मोटरसायकल बसले होते. आधीच रस्ते खराब असताना असा जीवघेणा प्रवास करण्यात येत होता.

ABOUT THE AUTHOR

...view details