महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भीम आर्मीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; एनआरसी, सीएए कायद्याला विरोध - अकोला भीम आर्मी न्यूज

भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी एनआरसी आणि सीएए कायद्यांना जोरदार विरोध केला आहे. त्यांचे अनुकरण करत अकोल्यात मोर्चा काढण्यात आला.

भीम आर्मीच्यावतीने काढण्यात आलेला मोर्चा
भीम आर्मीच्यावतीने काढण्यात आलेला मोर्चा

By

Published : Jan 28, 2020, 10:47 AM IST

अकोला -भीम आर्मीनेराष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (सीएए) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. भीम आर्मीचे अकोला अध्यक्ष फिरोज खान यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

भीम आर्मीच्यावतीने काढण्यात आलेला मोर्चा


केंद्र सरकार एनआरसी आणि सीएएमुळे देशात दुफळी माजवण्याचे काम करत आहे. असा अमानुष कायदा रद्द करण्यात यावा, अशी मागणी भीम आर्मीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केली. या मोर्चात महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

हेही वाचा - 'बहीण म्हणून विनंती करतो, पंकजा मुंडेंनी 6 महिने सरकारला वेळ द्यावा'
एनआरसी आणि सीएए कायद्याविरोधात देशभरात आंदोलन सुरू आहे. भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी या कायद्यांना जोरदार विरोध केला आहे. त्यांचे अनुकरण करत अकोल्यात मोर्चा काढण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details