महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बेंबळा प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडले; नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा - गावांना सतर्कतेचा ईशारा दिला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेले बेंबळा धरण शंभर टक्के भरले असून दोन दरवाजे 25 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने काठावरील गावांना सतर्कतेचा ईशारा दिला आहे.

बेंबळा प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडले; नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

By

Published : Sep 21, 2019, 8:09 PM IST

यवतमाळ- जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेले बेंबळा धरण शंभर टक्के भरले असून दोन दरवाजे 25 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने काठावरील गावांना सतर्कतेचा ईशारा दिला आहे.

बेंबळा प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडले; नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

हेही वाचा -विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचा राज ठाकरेंना कार्टूनमधून चिमटा!

जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून कुठे तुरळक तर कुठे मुसळधार पाऊस कोसळत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेले बेंबळा धरण शंभर टक्के भरले आहे. धरणातून सायंकाळपासून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. जलाशयाची पातळी 268 मीटर ईतकी असून एकूण जलसाठा 183.94 दलघमी आहे. तत्पूर्वी जिल्हा प्रशासनाकडून कळम, बाबुळगाव आणि राळेगाव या तीनही तालुक्यांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा - 'लोकशाही महोत्सवाचे स्वागत, सर्वांनी यात सहभागी व्हा'

ABOUT THE AUTHOR

...view details