अकोला -गेल्या पाच महिन्यांपासूनच्या थकीत वेतनाच्या मागणीसाठी कनिष्ठ आणि वरिष्ठ निवासी डॉक्टरांनी आज सर्वोपचार रुग्णालय परिसरात 'भीक मांगो' आंदोलन केले. यापूर्वी मंगळवारी या डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केले होते.
निवासी डॉक्टरांचे 'भीक मांगो' आंदोलन - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता
गेल्या पाच महिन्यांपासूनच्या थकीत वेतनाच्या मागणीसाठी कनिष्ठ आणि वरिष्ठ निवासी डॉक्टरांनी आज सर्वोपचार रुग्णालय परिसरात 'भीक मांगो' आंदोलन केले. यापूर्वी मंगळवारी या डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केले होते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयात कार्यरत कनिष्ठ तथा वरिष्ठ निवासी डॉक्टरांचे वेतन हे कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. विनावेतन कुटुंबाचा गाडा चालवावा तरी कसा, असा प्रश्न निवासी डॉक्टरांनी उपस्थित केला. यावेळी, रुग्णालयाच्या आवारात प्रशासना विरोधात निदर्शन करत त्यांनी भीक मागितली. डॉक्टरांनी नारेबाजी करत परिसर दणाणून सोडला. महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्या कक्षासमोर काही काळ ठिय्यादेखील देण्यात आला.
वेतनासंबंधात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून हे डॉक्टर आंदोलन करत आहेत. दरम्यान, या आंदोलनामुळे रुग्णालयाच्या सेवेवर परिणाम झाला आहे.