अकोला - येथील रेल्वे स्थानकाच्या सिमेंटच्या बाकड्यावर झोपलेल्या एका भिकाऱ्यास लोखंडी साहित्याने मारून हत्या करण्यात आली. आज (शुक्रवार) सकाळच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर ही घटना घडली. जीआरपी पोलिसांनी आरोपीला अटक केली. मात्र, हत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
अकोला रेल्वे स्थानकात भिकाऱ्याचा खून; आरोपी अटकेत - रेल्वे स्थानक
आरोपी सकाळी रेल्वेतून अकोला रेल्वे स्थानकावर आला. त्यानंतर त्याने रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर झोपलेल्या एका भिकाऱ्यावर हल्ला करून त्याचा खून केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अकोला रेल्वे स्थानकात भिकाऱ्याचा खून
आरोपी सकाळी रेल्वेतून अकोला रेल्वे स्थानकावर आला. त्यानंतर त्याने रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर झोपलेल्या एका भिकाऱ्यावर हल्ला करून त्याचा खून केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. अद्यापही मृताची ओळख पटली नसून आरोपीचे नावदेखील सांगितले नाही. मात्र, मृत आणि आरोपी नातेवाईक असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तसेच शोधपथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.