महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बाळापूर पोलिसांनी गोवंशांना दिले जीवनदान; सत्तावीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त - ठाणेदार नितीन शिंदे

बाळापूर पोलिसांनी कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या गोवंशांना जीवनदान दिले आहे. एका कंटेनरमध्ये हे गोवंश नेण्यात येत होती. हे गोवंश म्हैसपूर येथील गोरक्षण संस्थेमध्ये पाठवण्यात आली.

बाळापूर पोलिसांनी गोवंशांना दिले जीवनदान
बाळापूर पोलिसांनी गोवंशांना दिले जीवनदान

By

Published : Dec 6, 2020, 10:00 PM IST

अकोला -कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या गोवंशांना बाळापूर पोलिसांनी जीवनदान दिले आहे. बाळापूर पोलिसांनी एका कंटेनरला ताब्यात घेतले. त्यामध्ये सत्तर ते ऐंशी गोवंश आढळले. (आज) रविवारी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी कंटेनरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सत्तावीस लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

कंटेनर चालक फरार-

बाळापूर रस्त्यावर अकोल्याकडून खामगावकडे सत्तर ते ऐंशी गोवंशाने भरलेला कंटेनर कत्तलीच्या उद्देशाने जात आहे, अशी माहिती बाळापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे, भास्कर तायडे यांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी वाहनाचा शोध घेतला. तर एका कंटेनरमध्ये क्रूरतेने अंदाजे सत्तर ते ऐंशी गोवंशाची वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. कंटेनर चालक हा कंटेनर सोडून फरार झाला आहे.

यांनी केली कारवाई-

बाळापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन शिंदे यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे, भास्कर तायडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक जंजाळ, पोलीस हवालदार सुनील अंभोरे, विठ्ठल रायबोले, अमोल ओहेकर यांनी ही कारवाई केली. ताब्यात घेतलेल्या गोवंशांना म्हैसपूर येथील गोरक्षण संस्थेमध्ये पाठवण्यात आले.

हेही वाचा-मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

हेही वाचा-भरधाव टेम्पो चालकाने वाहतूक पोलिसाला चिरडले; सोलापुरातील घटना

ABOUT THE AUTHOR

...view details