महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोल्यात पालकमंत्री राहुटी प्रकल्प सुरू करून नागरिकांच्या समस्या जाणून घेणार - बच्चू कडू - पालकमंत्र्यांची राहुटी

नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदारांची राहुटी हा प्रकल्प राबवला. त्याचप्रमाणे पालकमंत्र्यांची राहुटी हा प्रकल्पही जिल्ह्यात सुरू करणार असल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त बोलताना सांगितले.

प्रजासत्ताक दिन अकोला
प्रजासत्ताक दिन अकोला

By

Published : Jan 27, 2020, 1:17 PM IST

अकोला - 'आमदारांची राहुटी' हा प्रकल्प राबवला. त्याचप्रमाणे 'पालकमंत्र्यांची राहुटी', असा प्रकल्प जिल्ह्यात सुरू करू, असे आश्वासन पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिले. शास्त्री स्टेडियम येथे त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

प्रजासत्ताक दिन अकोला

दिव्यांग, निराधार यांच्यासाठी जिल्ह्यात नवी योजना राबवून त्यांना प्रवाहात आणण्याचे काम करणार असल्याचेही ते म्हणाले. त्यासोबतच ज्याप्रमाणे 'एक राष्ट्रध्वज एक गाव' त्याचप्रमाणे 'एक राष्ट्रध्वज एक जिल्हा' अशी संकल्पना राबवून या जिल्ह्याचा नावलौकिक मिळवण्याचा संकल्प पुढच्या प्रजासत्ताक दिनी केला जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री बच्चू कडू यांनी केले. यावेळी आमदार गोपीकिशन बाजोरिया, महापौर अर्चना मसने, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, महापालिका आयुक्त जितेंद्र कापडणीस यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा - अकोल्यात चोरट्यांनी तीन दुकानात केली चोरी; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमासोबतच पोलीस दल, गृहरक्षक दल, एनसीसी, सैनिक आणि शाळेतील विद्यार्थ्यांच्या पथसंचलनाचेही निरीक्षण करण्यात आले. तसेच अग्निशमन दल, आरोग्य विभाग, सिंचन प्रकल्प राष्ट्रभक्तीपर देखावेही विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर करत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. यानंतर पालकमंत्र्यांनी माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. अपंग, निराधार तसेच पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन करून काही पुरस्काराचेही वितरण करण्यात आले.

हेही वाचा - वंचित आघाडीच्या बंदला अकोल्यात चांगला प्रतिसाद; कार्यकर्ते उतरले रस्त्यावर

ABOUT THE AUTHOR

...view details