महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Akola ZP Road Scam : त्यादिवशी मी पदावर राहणार नाही, बच्चू कडूंचे प्रकाश आंबेडकरांना प्रत्यूत्तर

बच्चू कडू यांनी निधी चोरला, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर ( Prakash Aambedkar Alligation On Bacchu Kadu ) यांनी केले होते. यावर पालकमंत्री बच्चू कडू ( Bacchu Kadu Replied To Prakash Ambedkar ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा होत्या. मात्र, त्यांनी आरोप करून अपेक्षा भंग केला असल्याचे ते म्हणाले.

Bacchu Kadu Replied To Prakash Ambedkar
Bacchu Kadu Replied To Prakash Ambedkar

By

Published : Feb 9, 2022, 2:32 AM IST

Updated : Feb 9, 2022, 8:39 AM IST

अकोला -बच्चू कडू यांनी निधी चोरला, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर ( Prakash Aambedkar Alligation On Bacchu Kadu ) यांनी केले होते. यावर पालकमंत्री बच्चू कडू ( Bacchu Kadu Replied To Prakash Ambedkar ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा होत्या. मात्र, त्यांनी आरोप करून अपेक्षा भंग केला आहे. मी त्यांना दोन तीन वेळा फोनही केला, मी त्यांना भेटायला गेलो होतो, ते भेटले नाही. पण माझा निधी चोरण्याचा प्रश्न येत नाही, ज्यादिवशी निधी चोरण्याचा प्रश्न येईल, त्यादिवशी बच्चू कडू पदावर राहणार नाही, असे ते म्हणाले.

प्रतिक्रिया

काय म्हणाले बच्चू कडू -

जिल्हा परिषदेने पीसीआय 1, पीसीआय2,3,4 असे करायला पाहिजे होते. ते मागच्या काळात ते जिल्हा परिषदेने केले नाही. आपल्या जिल्हा परिषद ताब्यात असताना ग्रामीण रस्त्याना प्राधान्य देणे होते, ते आपण केले नाही. म्हणून लोकप्रतिनिधी यांच्याकडून रस्त्याच्या काही मागण्या आल्या त्यामध्ये 30, 54, 50 54 मधून आपण त्यांना निधी दिला. यंत्रणा फक्त जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभाग काम करते. चोरांचा प्रश्न येत नाही, त्यामुळे त्यांनी जे काही आरोप केले ते काही अभ्यासपूर्ण नाही आहेत, असे बच्चू कडू म्हणाले.

काय आहे प्रकरण -

जिल्हा नियोजन समितीने पालकमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशाने जिल्हा वार्षिक योजनेतून (डीपीसी) रस्त्यांसाठी निधी देताना जिल्हा परिषदेने मंजुर केलेल्या रस्त्यांना निधी न देता अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांना निधी दिला होता. त्याविरोधात वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा करीत यासंदर्भात न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले होते.

प्रकाश आंबेडकर यांनी घेतली राज्यपालांची भेट -

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी केलेल्या अपहार प्रकरणी त्यांच्या विरुद्ध पोलीस चौकशी करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर आणि मुंबई महानगर अध्यक्ष अबुल हसन खान हे उपस्थित होते.

हेही वाचा - Goa Assembly Election :..म्हणून अमित शहांविरोधात तृणमूल काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकार्‍यांकडे तक्रार

Last Updated : Feb 9, 2022, 8:39 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details