महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अपंगांचा निधी खर्च न करणाऱ्या महापालिकेच्या अधिकार्‍यांवर करणार निलंबनाची कारवाई - पालकमंत्री बच्चू कडू

अपंगांसाठी असलेल्या योजनांचा गेल्या तीन वर्षापासून कुठलाही खर्च झालेला नाही. ही बाब गंभीर असून ज्या अधिकाऱ्यांनी हा खर्च केला नाही. त्या अधिकारांवर दोन दिवसात निलंबनाची कारवाई करणार असल्याचे कडूंनी स्पष्ट केले.

बच्चू कडू
बच्चू कडू

By

Published : Jan 16, 2020, 3:17 AM IST

अकोला - महापालिकेद्वारे अपंगांसाठी असलेल्या योजनांचा गेल्या तीन वर्षापासून कुठलाही खर्च झालेला नाही. ही बाब गंभीर असून ज्या अधिकाऱ्यांनी हा खर्च केला नाही. त्याअधिकारांवर दोन दिवसात निलंबनाची कारवाई करणार असल्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बुधवारी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

बच्चू कडू यांची पत्रकार परिषद

जिल्हाधिकारीऱ्यांच्या कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत बच्चू कडू बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीऱ्यांनी अपंगांसाठी चांगली काम केलेली आहेत. खिनखिनी या गावातील अपंगांना घरकुल मंजूर करून त्यांच्या घरांची बांधकामे पूर्ण झाली आहेत. त्या घरांचे उद्घाटन देखील करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेतर्फे अपंगांसाठीच्या सगळ्या योजना चांगल्या प्रकारे राबविण्यात येत असल्याचे सांगत त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच जिल्ह्यातील मोठे बंद पडलेले प्रकल्प आणि विविध रखडलेली कामे यांच्या मार्गातील अडथळे दूर करीत ती कामे पूर्णत्वास नेण्याचा प्राधान्यक्रम राहील. त्यासोबतच आरोग्याच्या संदर्भात अडचणी सोडविण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उंची 100 फुटांनी वाढणार, मंत्रिमंडळाची मान्यता

तसेच दिल्लीच्या धर्तीवर राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांच्या शाळा यांचा दर्जा सुधारण्यासाठी मुख्यमंत्री, कॅबिनेट शिक्षण मंत्री, आणि आमची बैठक झाली असून त्याबाबत लवकरच पावले उचलण्यात येतील, असेही ते म्हणाले. सोबतच विद्यार्थ्यांना लागणाऱ्या जातीचा दाखला हा शाळेतच उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामसेवक, तलाठी यांना सूचना दिल्या आहेत. यानंतर विद्यार्थ्यांना जातीचे दाखले शाळेत देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास पालकमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, मनपा आयुक्त जितेंद्र कापडणीस यांच्यासह आदी अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा -धक्कादायक.. नाशिकमध्ये भरयात्रेत चार वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार

ABOUT THE AUTHOR

...view details