महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Attack on Shivsena Leader: शिवसेना नेत्यावर भरचौकात प्राणघातक हल्ला - Shivsena Leader Attack

अकोला शहरातील वर्दळीच्या जठारपेठ चौकात शिवसेना (ठाकरे गट) उपप्रमुख पदावर कार्यरत विशाल कपले यांच्यावर धारदार शस्त्राने आज सायंकाळी प्राणघातक हल्ला करण्यात आला. (attack on Shiv Sena leader).

Shivsena Leader Attack
Shivsena Leader Attack

By

Published : Oct 30, 2022, 10:58 PM IST

अकोला: अकोला शहरातील वर्दळीच्या जठारपेठ चौकात शिवसेना (ठाकरे गट) उपप्रमुख पदावर कार्यरत विशाल कपले यांच्यावर धारदार शस्त्राने आज सायंकाळी प्राणघातक हल्ला करण्यात आला. (attack on Shiv Sena leader).

त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तात्काळ जवळच असलेल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी रामदास पेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून हल्ला कोणी व का केला याचा शोध घेत आहेत. (Shivsena Leader Attack in akola).

हल्याचे कारण अद्याप स्पष्ट नाही: कपले यांच्यावर हा हल्ला कशामुळे झाला, हे अद्याप समजू शकले नाही. या हल्ल्यात तीन ते चार जणांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हल्लेखोरांनी पाठलाग करून त्यांच्यावर हल्ला केला असे पोलिसांनी सांगितले.

या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. इन्वेस्तिगेशन कार घटनास्थळी दाखल झाली असून घटनास्थळावरून नमुने घेण्यात येत आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details