महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Minor Girl Abuse : अकोल्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; सोशल मीडियावरील चॅटिंगमधून घडला प्रकार - अकोल्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अल्पवयीन मुलीला ( Abuse of a Minor Girl ) पंचवीस वर्षीय युवकासोबत प्रेम झाले. त्या युवकाने अल्पवयीन मुलीचे शारीरिक शोषण केले. याप्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ( Life-Convict ) सुनावण्यात आली आहे. शिवाय 3 लाख 60 हजार रुपयांचा दंडही न्यायालयाने ठोठावला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्याच्या शिक्षेचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. पिंपळकर ( District and Sessions Judge V. D. Pimpalkar ) यांच्या न्यायालयाने दिले आहे.

रामदास पेठ पोलीस स्टेशन
रामदास पेठ पोलीस स्टेशन

By

Published : Dec 1, 2021, 8:11 PM IST

Updated : Dec 1, 2021, 8:21 PM IST

अकोला - सोशल मीडियाच्या चॅटींगमधून एका अल्पवयीन मुलीला ( Abuse of a Minor Girl ) पंचवीस वर्षीय युवकासोबत प्रेम झाले. त्या युवकाने अल्पवयीन मुलीचे शारीरिक शोषण केले. याप्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ( Life-Convict ) सुनावण्यात आली आहे. शिवाय 3 लाख 60 हजार रुपयांचा दंडही न्यायालयाने ठोठावला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्याच्या शिक्षेचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. पिंपळकर ( District and Sessions Judge V. D. Pimpalkar ) यांच्या न्यायालयाने दिले आहे.

माहिती देतांना माजी सरकारी वकील

विपुल विजय तेलगोटे ( 25, रा. बहिरखेड) याच्यासोबत सोशल मीडियावर पंधरा वर्षीय मुलीची ओळख झाली. बराच वेळ ते एकमेकांशी बोलत होते. पाच ते सहा महिन्यांपासून त्यांच्यामध्ये सोशल मीडियावर ते एकमेकांच्या संपर्कात होते. त्यानंतर विपुल तेलगोटे याने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला भेटायला बोलावले. त्यानंतर ते भेटले व वेगवेगळ्या ठिकाणी फिरले. विपुल तेलगोटे याने त्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. अल्पवयीन मुलगी घरात नसल्याने तिच्या वडिलांनी तिचा शोध घेतला. याप्रकरणी त्यांनी 12 मार्च 2018 रोजी रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्यानंतर रामदासपेठ पोलिसांनी यामध्ये मुलीच्या मोबाइल लोकेशनवरून 14 मार्च रोजी मुलीसह विपुल तेलगोटे यास ताब्यात घेतले. मुलीच्या वैद्यकीय तपासणी अहवाल व विपुल तेलगोटे यांच्याविरोधात रामदासपेठ पोलिसांनी कलम 363, 354 अ, 376 (2) (एन) भादवि आणि कायद्याच्या कलम 3, 4, 5, 6, 7, 8, 11, 12 अंतर्गत गुन्हा दाखल केला.

विपुल तेलगोटे याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक स्वाती इथापे यांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने विपुल विजय तेलगोटे याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यासोबतच तीन लाख 60 हजार रुपयांचा दंडही ठोठावला. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षाही ठोठावली आहे. दंडाची रक्कम वसूल झाल्यास त्यातील अर्धी रक्कम पीडितेला देण्याचे आदेश दिले आहेत. माजी अतिरिक्त सरकारी वकील श्रीमती मंगला पांडे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली.

हेही वाचा -Rape on Minor Girl : कारागृहात बंद असलेल्या आईला जामीन मिळवून देण्याच्या बहाण्याने १४ वर्षीय मुलीवर बलात्कार

Last Updated : Dec 1, 2021, 8:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details