अकोला -जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघातील प्रचार आज सायंकाळी थांबला. तरी, उमेदवार छुप्या पद्धतीने विविध समाजाच्या नेत्यांच्या भेटीवर भर देत आहेत. सर्वच ठिकाणी उमेदवारांनी लावलेल्या फलकांना काढण्याचे आदेश देण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
प्रचार तोफा थंडावल्या; विविध समाजाच्या नेत्यांच्या भेटीवर उमेदवारांचा भर - प्रचाराचा शेवटचा दिवस
उमेदवार छुप्या पद्धतीने विविध समाजाच्या नेत्यांच्या भेटीवर भर देत आहेत. सर्वच ठिकाणी उमेदवारांनी लावलेल्या फलकांना काढण्याचे आदेश देण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
प्रातिनिधीक छायाचित्र
हेही वाचा -'भाऊ, आम्ही तुमच्याच सोबत'; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मतदारांचे उमेदवारांना आश्वासन
जाहीरपणे होणारा प्रचार आता छुप्या पद्धतीने सुरू झाला आहे. सर्व उमेदवार विजयासाठी जातीनिहाय गणिते जुळवण्यात दंग आहेत. त्यादृष्टीने विविध समाजांच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीसाठी उमेदवार व त्यांचे सहकारी रात्रीचा दिवस करत आहेत. मतदार वळवण्यासाठी उमेदवार परिश्रम घेत आहेत. त्यांच्या या परिश्रमाचा निकाल 24 ऑक्टोबरला लागणार आहे.