महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोल्याच्या महापौरपदी अर्चना मसने, तर उपमहापौरपदी राजेंद्र गिरी यांची निवड

अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या अर्चना मसने आणि उपमहापौर म्हणून राजेंद्र गिरी यांची निवड केली आहे.

अकोल्याच्या महापौरपदी अर्चना मसने

By

Published : Nov 22, 2019, 2:09 PM IST

अकोला -अकोला महापालिकेतील महापौर व उपमहापौर यांच्या निवडणुकीत काँग्रेसच्या बाजूने 13 काँग्रेसच्या नगरसेवकांनी मतदान केले. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य मतदानावेळी अनुपस्थित राहिले. एमआयएम, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी हे तटस्थ राहिले. भाजपच्या 48 नगरसेवकांनी पक्षाने दिलेल्या उमेदवारांना मतदान केल्याने त्यांचा विजय झाला. त्यामुळे नवीन महापौर म्हणून भाजपच्या नगरसेविका अर्चना मसने आणि उपमहापौर म्हणून राजेंद्र गिरी यांचा विजय झाला. महापौर आणि उपमहापौर यांच्या विजयाबाबत 'इटीव्ही भारत'चे भाकीत खरे ठरले आहे.

अकोल्याच्या महापौरपदी अर्चना मसने

अकोला महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडून अर्चना जयंत मसने व राजेंद्र गिरी यांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. महापालिका नगरसेवकांची 80 एवढी संख्या असून भाजपचे 48 नगरसेवक असल्याने सगळ्यात जास्त संख्या त्यांचीच आहे. तर, काँग्रेसचे 13, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांचे मिळून 26 असे संख्याबळ आहे. त्यामुळे महापौर अर्चना मसने आणि उपमहापौर राजेंद्र गिरी यांची निवड झाली आहे. काँग्रेसकडून महापौर पदासाठी अजरबी नसरीन मकसूद खान व उपमहापौर पराग कांबळे यांचा पराभव झाला.

या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर हे होते. निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, मनपा आयुक्त जितेंद्र कापडणीस उपस्थित होते. विजयी झालेल्या महापौर आणि उपमहापौर यांच्या स्वागतासाठी एकच जल्लोष करण्यात आला. यावेळी आतषबाजी करून गुलाल उधळण्यात आला. त्यासोबतच विजयी मिरवणूक काढण्यात आली.

हेही वाचा -लातूर महानगरपालिकेत भाजपला धक्का, काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे महापौर

भाजपकडून बजाविण्यात आला व्हीप

महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपकडून २ वेळा व्हीप बजाविण्यात आला होता. यामध्ये शिवसेना, एमआयएम हे तटस्थ राहिले. तर राकांचे चार नगरसेवक हे या निवडणुकीत सहभागी झाले नाही. पक्षाकडून त्यांना निवडणुकीत तटस्थ राहण्याचे आदेश दिल्याचे समजते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांपैकी नगरसेविका उषा विरक या सभागृहात हजर झाल्या होत्या. मात्र, थोड्या वेळाने त्या सभागृहातून निघून गेल्या.

हेही वाचा -मुंबईच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर, उप महापौरपदी सुहास वाडकर यांची बिनविरोध निवड

ABOUT THE AUTHOR

...view details