महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दहशतवाद विरोधी पथकाकडून देशी बनावटीच्या पिस्तुलासह काडतुसे जप्त - दहशतवाद विरोधी पथक कारवाई अकोला

दहशतवाद विरोधी पथकाने आज एकास देशी बनावटीच्या पिस्तुलासोबत दोन जिवंत काडतुसासह लक्झरी बसस्थानकाजवळ अटक केली. त्यांच्याविरोधात सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हमीदखान राशीदखान असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

अकोला
अकोला

By

Published : Mar 3, 2021, 9:30 PM IST

अकोला- गुप्त माहितीच्या आधारावर दहशतवाद विरोधी पथकाने आज एकास देशी बनावटीच्या पिस्तुलासोबत दोन जिवंत काडतुसासह लक्झरी बसस्थानकाजवळ अटक केली. त्यांच्याविरोधात सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हमीदखान राशीदखान असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

भगतवाडीमध्ये राहणारा सराईत गुन्हेगार हमीदखान राशिदखान लक्झरी बसस्थानक परिसरात देशी रिव्हॉलवरसोबत घेऊन चोरी, जबरी चोरीचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत आहेत, अशी माहिती दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक विलास पाटील यांना मिळाली. त्याठिकाणी त्यांनी पथकासह छापा टाकला. त्यावेळी त्यांनी हमीदखान यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडून एक देशी बनावटीची पिस्तूल किंमत दहा हजार रुपये व दोन जिवंत काडतुसासह अवैधरित्या विनापरवाना बाळगताना मिळून आला. त्याच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याचे कलम 3, 25 व मुंबई पोलीस अधिनियम कलम 135 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details