अकोला - जुगाराच्या छाप्यात शस्त्राचा साठा मिळून आल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत. आठ तलवार, भाले, चाकू आणि कुऱ्हाड असा शस्त्रांचा साठा जप्त करीत दहशतवादविरोधी पथकाने जुगारासोबतच एक लाख 77 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या सर्वांवर रामदास पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरात जुगाराचा क्लब
पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या दहशतवादविरोधी पथकाने माहितीच्या आधारावर दीपक चौक येथील सितु वर्मा याने आपले घरात जुगाराचा क्लब भरविलेला असून तो पैशांची बाजी लावून 52 तास पत्त्यावर जुगार खेळवित आहे, अशी माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारावर दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी पथकासह छापा टाकला. या कारवाईत पाच जण मिळून आले. पथकाने एकूण एक लाख 77 हजार 200 रूपयांचा ऐवज जप्त केला आहे.