महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष  तुषार पुंडकर खून प्रकरण : चुलत भावाच्या खुनाचा घेतला बदला

चुलत भावाच्या खूनाचा बदला घेण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर खून केल्याचे आरोपी पवन सैदानी याने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. यासाठी मागील एक वर्षापासून तयार केल्याचेही त्याने सांगितले आहे.

संपादीत छायाचित्र
संपादीत छायाचित्र

By

Published : Apr 2, 2020, 8:51 PM IST

अकोला- प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर गोळीबार करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी या गुन्ह्यांमध्ये वापरण्यात आलेली दुसरी पिस्तुल अकोट येथील एका विहिरीतून जप्त केली आहे. चुलत भावाच्या खुनाचा बदला घेतला असल्याचे आरोपी पवन सैदानी याने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

तुषार पुंडकर खून प्रकरण : चुलत भावाच्या खुनाचा घेतला बदला

प्रहार जनशक्तीचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर अकोट शहर पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस असलेल्या पोलीस वसाहतीतून 21 फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजता येत होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांचा पाठलाग केला. त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यामुळे पुंडकर हे काही क्षणातच रक्ताच्या थारोळ्यात पडले. गोळीबारानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनास्थळावरून येथील गावठी बनावटीचे पिस्तुल आणि दोन काडतुसे आढळली. खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने घटनेत वापरलेली दुसरी पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस अकोट येथील एका विहिरीतून जप्त केली आहे. त्यासोबतच 2013 मध्ये दहीहंडा येथे तेजस सैदानी यांच्या या खून प्रकरणात तुषार फुंडकर हे आरोपी होते. त्याचाच बदला घेण्यासाठी तुषार फुंडकर यांचा खून केला असल्याचे आरोपी पवन सैदानी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. या कटाची तयारी गेल्या वर्षभरापासून आम्ही तयारी करत असल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले. सध्या हे आरोपी पोलीस कोठडीत आहेत.

हेही वाचा -Coronavirus : निजामुद्दीनमधील 'मरकझ'ला उपस्थिती लावलेले 4 जण आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली

ABOUT THE AUTHOR

...view details