अकोला - लोकसभा निवडणुकीच्या नामनिर्देशन अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. वंचित बहुजन आघाडी, भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र परिवर्तन सेना, काँग्रेस, रिपाइं, बहुजन समाज पार्टी या पक्षांनी १४ अर्ज घेतले. यामध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे अकोल्यातून प्रा. अंजली प्रकाश आंबेडकर यांच्यातर्फे राजेंद्र पातोडे यांनी अर्ज घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वंचित आघाडीच्या प्रा.अंजली आंबेडकरांनी अकोल्यातून घेतला उमेदवारी अर्ज - वंचित आघाडी
नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी अपक्ष व राजकीय पक्षांनी ३० अर्ज घेतले. अपक्षांनी १६ तर राजकीय पक्षांनी १४ अर्ज घेतले. या पक्षांमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रा. अंजली प्रकाश आंबेडकर यांच्यातर्फे राजेंद्र पातोडे यांनी ४ अर्ज घेतले.
भाजपचे खासदार संजय धोत्रे यांच्यातर्फे अविनाश कुलट यांनी २ अर्ज तर काँग्रेसतर्फे डॉ. अरुण भागवत यांनी २ अर्ज घेतले. अकोला लोकसभा मतदार संघातील ३ मोठ्या पक्षांनी पहिल्या दिवशी अर्ज घेतले आहे. आरपीआय २, महाराष्ट्र परिवर्तन सेना २, बहुजन समाज पार्टी २ यांनीही पहिल्या दिवशी अर्ज घेतले आहेत.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या १०० मीटररपर्यंत पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या सर्व रस्त्यावर पोलिसांचा खडा पहारा होता. सगळीकडे बॅरीकेट्सही लावण्यात आले होते.