महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जनावरांनाही उकाड्याचा त्रास; नदीकाठी घेतात 'आसरा'

कापशी येथील जनावरांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी तलावाकडे मोर्चा वळवला. त्यानंतर थेट नदीच्या पात्रातच बसून उष्णतेची दाहकता कमी करण्यासाठी पाण्याचा 'आसरा' घेतला.

By

Published : May 13, 2019, 3:50 PM IST

नदीकाठी बसलेली जनावरं

अकोला- तापमानातील उष्णता कमी झाली नसून पाण्यासाठी दाही दिशा फिरणाऱ्या नागरिकांसह जनावरेही नदीकडे धाव घेत आहेत. कापशी येथील जनावरांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी तलावाकडे मोर्चा वळवला. त्यानंतर थेट नदीच्या पात्रातच बसून उष्णतेची दाहकता कमी करण्यासाठी पाण्याचा 'आसरा' घेतला. अकोला जिल्ह्यात सगळीकडे जनावरे असा नदीकाठी आसरा घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

नदीकाठी बसलेली जनावरं


अकोल्याचे तापमान 47 अंशाच्या वर गेले आहे. आता हे तापमान गेल्या आठ ते दहा दिवसांपासून कमी होत आले आहे. तरीही पारा 44 अंशाच्या जवळपास राहत आहे. तापमान जरी कमी झाले असले, तरी उष्णतेची दाहकता कमी झालेली नाही. उष्णतेमुळे नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी वणवण धाव घेत आहेत. अनेक ठिकाणी तर थंड पाण्याच्या 'पानपोया' लागलेल्या आहेत. बरेच ठिकाणी जनावरांना पाणी मिळत नसल्याने ते पाण्याचा शोध घेत आहेत. जनावरे गढूळ पाणी पितानाही दिसून येत आहेत.


पाणी पिण्यासाठी मात्र जनावरांची परवड होत आहे. ग्रामीण भागामध्ये या पशुपालकांसाठी पाणी दूरवरून आणावे लागत आहे. तर काही पशुपालक जनावरांना गावातील तलाव, नदीपात्र, नाले आणि डबके यांच्या बाजूने चाऱ्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी पाठवत आहेत. हा प्रकार ग्रामीण भागात असला, तरी शहरी भागातील जनावरे मात्र नागरिकांच्या घरासमोर उभे राहून आपल्या पोटाची आणि पिण्याच्या पाण्याची तहान भागवण्यासाठी फिरत असल्याचे दिसून येते. काही नागरिकांनी जनावरांच्या पाण्यासाठी घरासमोर छोटे सिमेंटचे खोल प्यावू तयार करून त्यामध्ये पाणी उपलब्ध करून दिले आहे. त्यावर जनावरे पाणी पीत आहेत. परंतु, गावात मात्र, गुराख्याकडे जनावरे सोपवून त्यांचा चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न सोडवीत आहेत.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details