अकोला - काला चबुतरा परिसरातील एका घराला सोमवारी रात्री आग ( Fire in Kala Chabutra area ) लागली होती. या आगीत घरातील 64 वर्षे वृद्ध गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू ( Death of a 64-year-old man ) झाला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रन मिळवलेआहे. अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. इकबाल हुसेन असे मृत्यू ( Iqbal Hussain dies in fire ) झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
Akola Fire News : अकोल्यात एका घराला भीषण आग ; आगीत गंभीरित्या भाजलेल्या वृद्धाचा मृत्यू - Akola Latest News
अकोल्यात एका घराला लागलेल्या आगीत (Incident of fire in Akola) गंभीरित्या भाजलेल्या वृद्धाचा मृत्यू झाला आहे. आगीची ही घटना सोमावारी रात्री घडली.
काला चबुतरा परिसरातील काली मशिदीजवळ एका घराला रात्री आग लागली ( House on fire near Kali Masjid ) होती. पाहता पाहता या आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीमध्ये घरात राहणारे 65 वर्षे इकबाल हुसेन गुलाम यांचा मृत्यू झाला. यासोबतच घरातील साहित्य जळून खाक झाले आहे. तसेच गंभीर भाजलेल्या इकबाल हुसेन याला नागरिकांनी सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. अग्निशमन दलाने येत या आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
गजबजलेल्या वस्तीमध्ये लागलेल्या या आगीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परिसरातील नागरिकांनी आग विझवण्यासाठी घरातील पाणी आणून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, अग्निशमन दलाने आल्यानंतर ही आग लगेच आटोक्यात आणली. आग पसरली असती तर मोठा अनर्थ घडला असता. परंतु, अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे ही आग पसरली नाही.