महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Amol Mitkari : 'शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दंगली...'

छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले राजगडावर साजरा केला जात आहे. या सोहळ्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी सरकारला सुनावले आहे. त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात ते बोलत होते.

Amol Mitkari
आमदार मिटकरी

By

Published : Jun 2, 2023, 6:55 PM IST

माहिती देताना आमदार मिटकरी

अकोला:जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळा या सरकार आणि भाजपने घेतला आहे. ते म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज यांचे सनातनिकरण, त्यांच्या इतिहासाचे विकृतीकरण, हिंदू मुस्लिमांमध्ये दंगली निर्माण करून खासदार, आमदार आणि मुंबई महापालिका निवडणूका समोर ठेवून जिंकण्याचे पापाचे कटकारस्थान आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आज केला आहे.

दंगली आखण्याचे कटकारस्थान: पुढे ते म्हणाले, हे जे शिवाजी महाराजांच्या नव्हे त्यांच्या इतिहासाचे विकृतीकरण करीत आहे, या सर्वांना महाराष्ट्रातील जनता टकमकीच्या टोकावरून कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही, हा आम्हाला विश्वास आहे. आजचा सोहळा हा श्रद्धेपोटी नव्हता, शिवरायांच्या सन्मानापोटी नव्हता, तर स्वतःची राजकारणची राजकीय पोळी भाजण्यासाठी होता. आमच्या पक्षाचे खासदार जे तिथले खासदार आहेत, ते सुनील तटकरे यांनी या कार्यक्रमातून काढता पाय घेतला. कारण तिथे कुठल्याही सुखसुविधा मावळ्यांना दिल्या गेल्या नाही, असेही ते म्हणाले. राज्यभिषेक सोहळा 6 जूनला आहे. मी त्याच्या सर्वाना शुभेच्छा देतो. मात्र, या कार्यक्रमाच्या दृष्टीने महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम दंगली आखण्याचे कटकारस्थान आखल्या गेले आहे. याचा शोध महाराष्ट्रातील जनतेने घेतला पाहिजे, असे आमदार मिटकरी म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे सनातनिकरण, त्यांच्या इतिहासाचे विकृतीकरण, हिंदू मुस्लिमांमध्ये दंगली निर्माण करत आहे. आजचा सोहळा हा श्रद्धेपोटी नव्हता, शिवरायांच्या सन्मानापोटी नव्हता, तर स्वतःची राजकारणची राजकीय पोळी भाजण्यासाठी होता.तुमचा या टकमकीवरून लवकरच जनता कडेलोट करेल - आमदार मिटकरी



मोहन भगवंतानी उत्तर द्यावे:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांनी भाषणात असे म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे हिंदवी स्वराज्य म्हणजे हेच हिंदू राष्ट्र. हा असा अफलातून शोध मोहन भागवत यांनी कसा काय लावला, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. शिवाजी महाराजांनी तयार केलेले हे राज्य, भोसले, मराठी, हिंदूंचे राज्य नव्हते तर ते रयते लोककल्याणकारी स्वराज्य होते, असेही ते म्हणाले. शिवाजी महाराजांनी जर राज्य तयार केले आहे तर ते हिंदूंचे कसे म्हणता, याचे उत्तर मोहन भगवंतानी द्यावे, असे आमदार अमोल मिटकरी म्हणाले.



ज्यांची पात्रता नाही त्याला काय उत्तर देणार: काय टीका केली याला मी फारसे महत्त्व देत नाही, शेवटी मी पण शिवरायांचा इतिहास वाचून आमदार झालेला मावळा आहे. महाराजांच्या इतिहासात असे सांगितले आहे की, बरोबरीच्या माणसात तुलना करतात. छत्रपती संभाजी महाराज यांना शहजादा याने छत्रपती संभाजी महाराज यांना कुस्तीसाठी लढले होते. त्यावेळी संभाजी महाराज यांनी उत्तर दिले होते की, आम्ही आमच्या लायकीच्या बरोबरीतील लोकांसोबत कुस्ती खेळतो. मी महाराजांचा मावळा, मी देखील तेच उत्तर देणार, त्यामुळे ज्यांची बोलण्याची पात्रता नाही, त्याला काय उत्तर देणार, अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी केलेल्या व्यक्तव्याबद्दल आमदार अमोल मिटकरी यांनी दिली.

हेही वाचा -

Amol Mitkari अमोल मिटकरींनी अमरावती येथील वृद्धाश्रमाला दिली भेट म्हणाले या संताच्या विचारामुळेच मी

आमदार मिटकरींच्या त्या वक्तव्याविरोधात राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार

Amol Mitkari Criticize Governor मराठी माणसाचा अपमान खपवून घेणार नाही राज्यपालांनी माफी मागावी अमोल मिटकरी

ABOUT THE AUTHOR

...view details