महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गावात संपर्क साधण्यासाठी अकोट ग्रामीण पोलिसांनी तयार केला सोशल मीडिया ग्रुप - akola corona news

अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर फड यांनी सोशल मीडियाचा उपयोग करीत एक 'कोविड -19 अकोट रूरल' असा ग्रुप तयार केला. या ग्रुपच्या माध्यमातून नव्वद गावांमधील असलेल्या समस्या तेथील निर्माण होणारे प्रश्न यावर तत्काळ उपायोजना होत असल्याने ग्रामीण पोलिसांचा त्रास कमी झाला आहे.

पोलीस
पोलीस

By

Published : May 8, 2020, 5:47 PM IST

Updated : May 8, 2020, 10:12 PM IST

अकोला - पोलीस ठाण्यांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या क्षमतेपेक्षा कमी आहे. त्यामुळे अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या 90 गावांमध्ये संपर्क साधने कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना नेहमीच अवघड जाते. त्यात कोरोनासंसर्ग प्रतिबंध करण्यासाठी शासनाने दिलेल्या आदेशानुसार आवश्यक तिथे तत्काळ मदत व्हायला हवी, या दृष्टिकोनातून अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर फड यांनी सोशल मीडियाचा उपयोग करीत एक 'कोविड -19 अकोट रूरल' असा ग्रुप तयार केला. या ग्रुपच्या माध्यमातून नव्वद गावांमधील असलेल्या समस्या तेथील निर्माण होणारे प्रश्न यावर तत्काळ उपायोजना होत असल्याने ग्रामीण पोलिसांचा त्रास कमी झाला आहे.

अकोट

कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभाग यासोबतच पोलीस विभागही चोवीस तास काम करीत आहे. जिल्ह्याच्या सीमा बंद झालेल्या असतानाही अनेक नागरिक किंबहुना मजूर गावांमध्ये प्रवेश करीत आहेत. प्रत्येक गावांमध्ये येणार्‍या नवीन माणसाची ओळख किंवा पाहुण्यांची माहिती पोलिसांपर्यंत मिळावी, यासाठी बीट जमादार यांना त्या गावात जाऊन तेथून माहिती काढणे अडचणीचे जात होते. तसेच पायी किंवा वाहनांवर ये-जा करणाऱ्या मजुरांची माहितीही गोळा करण्यासाठी पोलिसांना तान सहन करावा लागत होता. विशेष म्हणजे, ग्रामीण भागामध्ये प्रशासनाने ग्रामपंचायतीमधील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, तंटामुक्त अध्यक्ष, पोलीस पाटील, आशा वर्कर्स यांनाही या कामासाठी कर्तव्य बजावण्याची जबाबदारी दिली आहे. या सर्वांकडून पोलिसांना माहिती मिळेपर्यंत बराच वेळ जात होता. पोलीस आणि प्रशासन यांच्यामध्ये ताळमेळ राहत नसल्याचे दिसत होते. यावर उपाय म्हणून अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर फड यांनी 90 गावांमधील जबाबदार व शासकीय व्यक्तींना मिळून 'कोविड -19 अकोट रूरल' असा सोशल मीडियावर ग्रुप तयार केला. या ग्रुपच्या माध्यमातून पोलिसांवरील ताण त्यासोबतच प्रशासनाच्या समन्वय साधण्याचा महत्त्वपूर्ण प्रयोग या माध्यमातून झाला आहे. त्यामुळेच गावामध्ये किंवा जिल्ह्यात येणाऱ्या नवीन व्यक्ती त्यासोबतच मजुरांची माहिती व संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींना येणाऱ्या समस्यांचे निराकरण या ग्रुपच्या माध्यमातून होत आहे.

Last Updated : May 8, 2020, 10:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details