अकोला - अकोला जिल्हा परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडीची सत्ता आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने आहेत. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या कारभाराबाबत पक्षांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. या नाराजीबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड प्रकाश आंबेडकर यांच्याकडे तक्रार करण्यात आली. त्या तक्रारीनंतर त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा मागितला होता. या घडामोडीनंतर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा राज्य उपाध्यक्ष प्रा. धैर्यवर्धन पुंडकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे. दरम्यान, या राजीनामा नाट्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये खळबळ उडाली आहे.
अकोला जिल्हा परिषद अध्यक्षांनी दिला राजीनामा, प्रकाश आंबेडकरांकडे आल्या होत्या तक्रारी - Political developments in Akola Zilla Parishad
अकोला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राजीनामा मागितला होता. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा वंचितचे राज्य उपाध्यक्ष प्रा. धैर्यवर्धन पुंडकर यांच्याकडे सुपूर्त केला आहे.
'18 जुनला दिला राजीनामा'
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतिभा भोजने यांनी त्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. धैर्यवर्धन पुंडकर यांच्याकडे त्यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. काही दिवसांपासून जिल्हा परिषदेत अध्यक्ष प्रतिभा भोजने यांच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत होती. याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडेही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे एप्रिल महिन्यापासूनच जिल्हा परिषदेमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. परंतु, मध्यंतरीच्या काळात खांदेपालटाच्या चर्चांना विराम मिळाला होता. दरम्यान, 18 जुनला अध्यक्ष प्रतिभा भोजने यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. प्रतिभा भोजने यांनी राजीनामा दिल्याच्या वृत्ताला वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष पुंडकर यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, प्रतिभा बापुराव भोजने या वंचित बहुजन आघाडीच्या भांबेरी सर्कलमधून निवडून आल्या आहेत. गेली 29 वर्षे त्यांनी विविध प्रमुख पदांवर काम करत पक्षातील सभा संमेलन, आंदोलन यामध्ये सक्रिय भाग घेतला आहे.