महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोला जिल्हा परिषद 'दुधपूर्णा' नावाने दूध उत्पादक संघ स्थापन करणार - अकोला दुधपूर्णा दूध उत्पादक संघ

जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून राबविण्यात येणाऱ्या दुधाळ जनावरे वाटप योजनेसाठी अनुसूचित जाती, जमातीच्या 521 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. या लाभार्थ्यांच्या माध्यमातूनच दुधपूर्णा नावाने दूध उत्पादक संघ स्थापन करण्यात येणार आहे.

अकोला जिल्हा परिषद 'दुधपूर्णा' नावाने दूध उत्पादक संघ स्थापन करणार

By

Published : Aug 4, 2019, 7:55 PM IST

अकोला - जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती जमातीसाठी दुधाळ जनावरे वाटप योजना राबण्यात येते. यासाठी 521 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. याच लाभार्थ्यांच्या माध्यमातून एक दूध उत्पादक संघ स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

अकोला जिल्हा परिषद 'दुधपूर्णा' नावाने दूध उत्पादक संघ स्थापन करणार

"दुधपूर्णा" नावाने दूध उत्पादक संघ

अकोला जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जातात. यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमधील लाभार्थ्यांची निवड करून त्यांचे आर्थिक सबलीकरण करण्याच्या उद्देशाने अनेक योजना आहेत. दुधाळ जनावरे वाटप ही यापैकीच एक योजना आहे. ज्या लाभार्थ्यांना ही दुधाळ जनावरे मिळतात. ते लाभार्थी बऱ्याच वेळा ही जनावरे विकून पैसे घेतात. 'दुधपूर्णा' उत्पादक संघ स्थापन केल्यास या समस्येला आळा घालता येईल. या प्रकल्पासाठी जिल्हा परिषद पाच कोटी रुपये खर्च करणार आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असणार आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दुधाळ जनावरे वाटप योजनेला दिलेले हे व्यापक स्वरूप आहे. या प्रकल्पासाठी इतर दूध उत्पादक संघाची मदत घेण्यात येणार आहे. या संघाच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थी महिन्याला अंदाजे बारा हजार रुपये कमाई करू शकेल असा विश्वास आयुष प्रसाद यांनी व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details