अकोला - प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केलेल्या तीनही आरोपींना आज स्थानिक गुन्हे शाखेने अकोट न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या तिघांनाही नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
तुषार पुंडकर हत्येतील आरोपींना 9 दिवसांची पोलीस कोठडी - तुषार पुंडकर हत्येतील आरोपींना 9 दिवसांची पोलीस कोठडी
तुषार पुंडकर यांच्यावर 21 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या दरम्यान दोन गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. एक देशी बनावटीचे पिस्तूल व काडतूस घटनास्थळी मिळाले होते.
तुषार पुंडकर यांच्यावर 21 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या दरम्यान दोन गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. एक देशी बनावटीचे पिस्तूल व काडतूस घटनास्थळी मिळाले होते. या घटनेचा तपास लावण्यासाठी अमरावती पोलीस महानिरीक्षक यांनी बाहेरून पोलीस अधिकारी बोलावून सहा पथके तयार केली होती. स्थानिक गुन्हे शाखेने या तपासात पवन सैदानी, शाम उर्फ स्वप्नील नाठे, अल्पेश दुधे या तिघांना अटक केली.
या तिघांनी घटनेची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी या तिघांना अकोट न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या तिघांना 4 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या तिघांकडून पोलीस अनेक प्रश्नांची उकल करणार आहेत. हा खून कोणत्या कारणाने केला, यामध्ये आणखी किती जण सहभागी आहेत, कोणाच्या सांगण्यावरून हा खून केला का?, घटनेनंतर आरोपी कुठे गेले होते, शस्त्र कोठून घेतले, यासह आदी प्रश्न पोलिसांना तपासा दरम्यान पडलेले आहेत.