महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अवैधरित्या दारू तस्करीवर जिल्हा पोलिसांची कारवाई - Akot Road Illegal Alcohol Seizure News

अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्यांवर खदान पोलीस आणि विशेष पोलीस पथकाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली. या कारवाईत ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक केलेल्या आरोपीसह जप्त केलेला दारू साठा

By

Published : Nov 17, 2019, 1:26 PM IST

अकोला- अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्यांवर खदान पोलीस आणि विशेष पोलीस पथकाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली. या कारवाईत ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, एकाच दिवशी या दोन कारवाया झाल्या आहेत. याचा अर्थ जिल्ह्यात अवैधरित्या दारू वाहतुकीची कामे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाकावर टिच्चून करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

अटक केलेल्या आरोपीसह जप्त केलेला दारू साठा

खदान पुलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या न्यू पील काँलनी परिसरातून अतुल सुधाकर कावडे हा देशी दारूची अवैधरित्या वाहतूक करीत होता. खदान पोलिसांनी त्याला पकडून त्याच्याकडील २६ हाजार रुपयांची दारू जप्त करीत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर दुसऱ्या कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने अकोट फाईल पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या अकोट रोडवर केली. यामध्ये पथकाने विनोद गेडाम याच्याकडून ४२ हजार २४० रुपयांची अवैधरीत्या वाहतूक होणारी देशी दारू आणि दुचाकी जप्त केली व त्याच्यावर अकोट फाइल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

दरम्यान, जिल्ह्यात अवैधरित्या सुरू असलेले जुगार अड्डे आणि गावठी दारू भट्टी, तसेच अवैध दारू वाहतुकीची कामे मोठ्या प्रमाणात होत असून याकडे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दुर्लक्ष होत आहे. ग्रामीण भागामध्ये अवैधरित्या सुरू असलेले दारूचे आणि गावठी दारूचे अड्डे यावर निर्बंध लावण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला अपयश आल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा-अकोल्यात शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनाच कार्यालयात कोंडले

ABOUT THE AUTHOR

...view details