अकोला - जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या जुगारावर काल(मंगळवार) सायंकाळी छापा टाकला. यावेळी पथकाने 14 जणांवर जुगार खेळत असल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी एक लाख 58 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जुने शहर परीसरातील एका तडीपार असलेल्या व्यक्तीसही पथकाने अटक केली आहे.
विशेष पथकाची जुगार अड्ड्यावर धाड; एक लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त - akola police raid on gamblers
पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांचे विशेष पथक गस्तीवर असताना त्यांना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. पथकाने ट्रान्सपोर्ट नगरातील जुगारावर छापा टाकला.
पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांचे विशेष पथक गस्तीवर असताना त्यांना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. पथकाने ट्रान्सपोर्ट नगरातील जुगारावर छापा टाकला. वसंत शेषराव उकर्डे, गजानन किसण इंगळे, राजेश कमलेश पांडे, शैलेष मोहन साबळे, सतीष राजाराम निंबोरे, संतोष आकराम वानखडे, सैयद रहीम सैयद इब्राहीम, शेख खलील शेख ख्वाजा, मोहम्मद हारीस मोहम्मद साबीर, ईरफान देशमुख गुलाम अहमद, जलील खा इब्राहीम खा पठाण, पुरूषोत्तम दामोदर लासुरकर, आनंदा नागोराव नेमाडे आणि व्यवसाय मालक शेख रशीद शेख लतीफ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पथकाने एक लाख 58 हजार 700 मुद्देमाल जप्त केला आहे.
तसेच शहरातून ६ महिन्यांकरीता तडीपार केलेला धनराज उर्फ कालू संजय कुचर हा शहरातच मिळून आल्याने त्यांचे विरूध्द पोलीस स्टेशन जुने शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.