अकोला - कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे राज्यसरकार आजपासून (बुधवार) संचारबंदीच्या नियमांमध्ये बदल करत ही नियमे कठोरपणे राबविण्यासाठी सुरुवात केली आहे. औषध दुकानदार व्यतिरिक्त जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांना सकाळी सात ते सांयकाळी अकरा वाजेपर्यंत व्यवसायाची सूट दिली आहे. त्यानंतर मात्र सर्वत्र संचारबंदीचे आदेश दिले आहे. सकाळी अकरानंतर रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईसाठी अकोला पोलीस प्रत्येक चौकात तैनात असल्याचे पहायला मिळत आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनीही स्वतः रस्त्यावर उतरत ऑटोचालक, दुचाकीचालकांवर कारवाई करत आहे.
अकोल्यात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांची कारवाई - विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांची कारवाई
विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करत त्यांची वाहने जप्त केली आहेत. तर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ज्या व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली होती. त्या दुकानदार व काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जवळपास शंभरच्यावर नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
नव्या नियमानुसार सकाळी अकरानंतर शहरात पूर्णपणे संचारबंदीचे आदेश दिले आहेत. विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचे आदेश असल्याने प्रत्येक पोलीस ठाण्यातील हद्दीमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी केली आहे. विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करत त्यांची वाहने जप्त केली आहेत. तर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ज्या व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली होती. त्या दुकानदार व काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जवळपास शंभरच्यावर नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तसेच पाचशेपेक्षा जास्त वाहनांवर पोलिसांनी जप्तीची कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत आणि शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम हे स्वतः रस्त्यावर उतरले होते. त्यांनी वाहनचालकांवर कारवाई केली आहे. तसेच विनाकारण फिरणाऱ्या चालकांवर ही कारवाई केली जात आहे.
हेही वाचा-पोटात ५ महिन्यांचे बाळ, हातात काठी, ही DSP आहे छत्तीसगडची लेडी सिंघम