अकोला - व्यवसायिक किसनराव हुंडीवाले यांचा सोमवारी चॅरिटी कमिशनर कार्यालयात खून झाला. या हत्या कांडातील आरोपी भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम उर्फ छोटू गावंडे, श्रीराम गावंडे, धिरज गावंडे हे आज रामदास पेठ पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी या तिघांनाही अटक केली आहे. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे विक्रम उर्फ छोटू गावडे हे भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत.
किसन हुंडीवीले खुन प्रकर्णी भाजप प्रदेश उपाध्यक्षा सह 2 आरोपी पोलिसांना आले शरण रामदास पेठ पोलीस ठाण्यात हजर झालेले आरोपी श्रीराम गांवडे हे विक्रम उर्फ छोटू गावडे यांचे वडील आहेत. श्रीराम गांवडे यांच्या पत्नी अकोल्यातील भाजपच्या माजी महोपैर आणि विद्यमान नगरसेविका आहेत. विक्रम उर्फ छोटू गावंडे हे भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत.
श्रीराम गावंडे आणि किसनराव हुंडीवाले यांची जुनी मैत्री होती. या मैत्रीतून दोघानी काही मालमत्ता एकत्रीत खरेदी केल्या होत्या. त्यांची एक शिक्षण संस्था सुध्दा आहे. दोघा मध्ये काही कारणावरून वाद झाला. त्यामुळे एकमेकांविरुद्ध त्यांनी पोलीस तक्रार आणि संस्थेच्या विरोधात चॅरीटी कमिशनर कार्यालयात प्रकरणे दाखल केली होती. दोघेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत होते. परंतु, हा वाद विकोपाला गेला. सोमवारी किसनराव हुंडीवाले चॅरिटी कमिशनर यांच्या कार्यालयात वकिलासोबत आले होते. त्यावेळी श्रीराम गावंडे, विक्रांत उर्फ छोटू गावंडे, प्रवीण श्रीराम गावंडे, रणजीत श्रीराम गावंडे, धीरज प्रल्हाद गावंडे, सतीश तायडे, विशाल तायडे, साबिर आणि चार ते पाच जण यांनी कार्यालयातच किसनराव हुंडीवाले यांच्यावर खुर्ची आणि आग विझवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलेंडरने जोरादार हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर सर्व आरोपी पसार झाले. यामधील श्रीराम गावंडे, धीरज गावंडे हे रामदासपेठ पोलीस ठाण्यात हजर झाले. इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी प्रवीण किसनराव हुंडीवाले यांच्या फिर्यादीवरून सिव्हिल लाइन पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत