महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोला मनपा पूर्व क्षेत्रातील होम आयसोलेशनमध्‍ये असलेल्‍या कोरोना रुग्णांना कीटचे वितरण - अकोला कोरोना

अकोला महानगरपालिका क्षेत्रातील पूर्व झोन अंतर्गत कोरोना आजाराची लक्षणे जास्‍त नसलेल्‍या होम आयसोलेशनमध्‍ये असलेल्‍या कोरोना पॉझिटीव्‍ह रुग्‍णांना औषधी कीटचे वितरण आज करण्‍यात आले.

corona medical kit to corona positive patient
corona medical kit to corona positive patient

By

Published : May 24, 2021, 10:02 PM IST

Updated : May 24, 2021, 10:11 PM IST

अकोला - महानगरपालिका क्षेत्रातील पूर्व झोन अंतर्गत कोरोना आजाराची लक्षणे जास्‍त नसलेल्‍या होम आयसोलेशनमध्‍ये असलेल्‍या कोरोना पॉझिटीव्‍ह रुग्‍णांना औषधी कीटचे वितरण आज करण्‍यात आले. ज्‍यामध्‍ये अ‌ॅन्‍टी व्‍हायरल औषधी, मल्‍टीव्हिटामिन औषधी, ताप, अंगदुखी, डोकेदुखीसाठी पॅरासिटामॉल औषधे आणि कोविड-19 चा प्रादुर्भाव टाळण्‍यास घ्‍यावयाची काळजी आणि कोविड – 19 चा संसर्ग झाल्‍यास घ्‍यावयाची काळजी बाबतच्या पत्रकाचा समावेश आहे.

मनपाकडून कोरोना रुग्णांकडून कोरोना कीटचे वितरण

पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्‍चु कडु यांच्‍या निर्देशाप्रमाणे मनपा आयुक्‍त नीमा अरोरा आणि मनपा वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी डॉ. अस्मिता पाठक यांनी कोरोना रुग्‍णांशी संवाद साधून त्‍यांना औषधी कशा प्रकारे घ्‍यावी, याबाबत तसेच कोरोनापासून स्‍वतःचे व आपल्‍या परिवारातील सदस्‍यांचा बचाव कशा प्रकारे करावा, याबाबत मार्गदर्शन केले.

..या दिल्या सूचना -

* नियमित मास्‍कचा वापर करणे
* हात साबणाने धुवावे
* सोशल डिस्‍टसिंग नियमाचे काटेकोरपणे पालन करणे.
* सौम्‍य लक्षणे जसे ताप, सर्दी, खोकला, थकवा, तोंडाची चव जाणे, वास न येणे अशा प्रकारची लक्षणे आढळल्‍यास त्‍वरीत चाचणी करणे.

कोविड-19 चा संसर्ग झाल्‍यावर या प्रकारे काळजी घ्‍यावी -


*पॉझिटिव्‍ह रुग्‍णांच्‍या संपर्कतील लोकांची कोरोना तपासणी करणे आवश्‍यक
*रुग्‍णांने स्‍वतःच ऑक्‍सीजन पातळीकडे लक्ष ठेवावे, ऑक्‍सिजन पातळी 90 पेक्षा खाली गेल्‍यास रुग्‍णालयात भर्ती अथवा तज्ञ डॉक्‍टरांशी संपर्क करावा.
*घरातील इतर सदस्‍यांशी संपर्क टाळावे व गृह विलगीकरणचे पालन करावे आणि दहा दिवस घराबाहेर निघू नये.
*गृह विलगीकरणामध्‍ये रहावयाचे असल्‍यास जवळच्‍या नागरी आरोग्‍य केंद्रास संपर्क साधावा.
*गृहविलगीकरणाचा नमुना अर्ज झोन कार्यालयामध्‍ये क्षेत्रीय अधिकारी यांच्‍याकडे नातेवाईकांमार्फत पाठवावे
*कोणत्‍याही रुग्‍णांनी घबरून न जाता व लक्षणे लपवुन न ठेवता त्‍वरीत आरोग्‍य विभागाशी संपर्क करावा
*याद्वारे पुढील त्रास आपण टाळू शकता तसेच या रोगाचा थेट फुफ्फुसाशी संपर्क होत असल्‍यामुळे जास्‍त काळजी घेणे आवश्‍यक आहे.

Last Updated : May 24, 2021, 10:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details