अकोला - आपल्या अनोख्या आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेले आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिव्यांगासाठी स्वतंत्र कल्याण मंत्रालयाची मागणी केली आहे. त्यांनी या संदर्भात 26 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र दिले आहे.
समाज कल्याण विभागाच्या मंत्रालयाची स्थापना -महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर मागासवर्गीय महिला व बालकल्याण विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागासवर्गीय कल्याण अपंगाचे विविध दुर्लक्षित घटकांचे कल्याणासाठी समाज कल्याण विभागाच्या मंत्रालयाची स्थापना केली होती. कालांतराने विविध कल्याणकारी घटकांच्या प्रशासकीय कामाचा व्याप वाढत गेला. प्रत्येक घटकाला न्याय देण्याच्या कल्याणाची उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने समाजकल्याण विभागातून एक कल्याणकारी घटक स्वतंत्र करून त्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांना पत्र - दिव्यांग कल्याण आयुक्तालय स्वतंत्र करण्यात आले असले, तरी दिव्यांग आयुक्तालयाचे व विभागाचे संपूर्ण नियंत्रण सामाजिक न्याय विभागाकडेच आहे. दिव्यांग देखील समान व्यवस्थित अत्यंत दुर्लक्षित घटक असून या घटकाच्या विशेष कल्याणासाठी स्वतंत्र मंत्रालय असणे, अत्यंत गरजेचे असल्याचे बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.