महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कडेकोट पोलीस बंदोबस्तात 'ईव्हीएम' गोदामात सील; परिसरात प्रवेशबंदी - khadan

जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदारसंघातील सर्व ईव्हीएम मशीन शुक्रवारी रात्री खदान येथील शासकीय गोदामात ठेवण्यात आल्या आहेत.

खदान येथील स्ट्राँगरुम

By

Published : Apr 20, 2019, 5:08 PM IST

अकोला - दुसऱ्या टप्प्यातील अकोला (०६) लोकसभा मतदारसंघासाठी १८ एप्रिलला निवडणूक पार पडली. त्यानंतर १९ एप्रिलच्या पहाटेपर्यंत सर्व ईव्हीएम मशीन एकत्रित करून त्या खदान येथील शासकीय गोदामात ठेवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी पोलिसांची कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. २३ मे ला याच ठिकाणी मतमोजणी होणार आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघात उमेदवारांचे भाग्य १८ एप्रिलला मतदानानंतर ईव्हीएममध्ये बंद झाले. त्यानंतर जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदारसंघातील सर्व ईव्हीएम मशीन शुक्रवारी रात्री खदान येथील शासकीय गोदामात ठेवण्यात आल्या आहेत. या गोदामाचे संरक्षण केंद्रीय राखीव पोलीस, राज्य राखीव पोलीस आणि स्थानिक पोलिसांच्या बंदोबस्तात राहणार आहे.

खदान येथील स्ट्राँगरुम विषयी देताना प्रतिनिधी
या ठिकाणी २३ मे'ला मतमोजणी होणार आहे. त्यानंतरही वर्षभर या ईव्हीएम मशीन खदान येथील शासकीय गोदामातच ठेवण्यात येणार आहेत. यादरम्यान प्रत्येक पोलीस अधिकारी आणि महसूल विभागाचे अधिकारी या ठिकाणी तपासणीसाठी येत राहणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details