अकोला -जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या आदिवासी विभागाकडून आदिवासी नागरिकांना मिळालेल्या बकऱ्या ह्या उपयोगी नसल्यामुळे लाभार्थ्यांनी थेट पालकमंत्री बच्चू कडू यांच्याकडे तक्रार केली. त्यांच्या तक्रारीनंतर लाभार्थ्यांशी सवांद साधताना पालकमंत्र्यांनी बकऱ्या बदलून देण्याचे निर्देश दिले आहेत. यानंतर असे पुन्हा असे झाले, तर अशा बकऱ्या अधिकाऱ्यांच्या घरी बांधू, अशी तंबी देखील बच्चू कडू यांनी दिली.
आदिवासी लाभार्थ्यांना बकऱ्या बदलून देण्याचे पालकमंत्री बच्चु कडू यांचे निर्देश... हेही वाचा... पत्नी मकरसंक्रांतीची तयारी करत होती अन् जवानाच्या वीरमरणाची बातमी आली
जिल्हा परिषदच्या पशुसंवर्धन विभागातर्फे आदिवासींना शेळी वाटप योजना 75 टक्के अनुदानावर राबिण्यात येते. या योजनेनुसार आदिवासी लाभार्थ्यांना शेळी वाटप करण्यात आल्या. या शेळ्या लाभार्थ्यांना अमरावती येथून घेण्यास भाग पडते. त्यावेळी या शेळ्या लाभार्थ्यांना देताना त्यांचे वजन वाढवून देण्यात आले. लाभार्थ्यांना मिळाल्यानंतर या शेळ्यांचे वजनाचे अंतर तीन ते चार किलो कमी पडले. त्यामुळे लाभार्थ्यांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे लाभार्थ्यांनी पालकमंत्री बच्चू कडू यांना याबाबत सांगितले.
हेही वाचा... अजित पवार हे आमच्या सरकारची 'स्टेपनी' - संजय राऊत
लाभार्थी बळीराम लोखंडे हे जिल्हाधिकारी कार्यालयात शेळ्या घेऊन आले. त्यांना या संदर्भात निवेदन दिले. या निवेदनानंतर पालकमंत्री कडू यांनी लाभार्थ्यांना याबाबत पुन्हा असा प्रकार घडणार नाही, असे आश्वासन दिले. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद प्रसाद यांना संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. या शेळ्या दोन दिवसात परत करा आणि चांगल्या शेळ्या द्या. पुन्हा जर असा प्रकार घडला, तर या शेळ्या अधिकार्यांच्या घरी बांधू, अशी तंबी देखील बच्चु कडूंनी दिली.