अकोला - जिल्हा परिषदेने कर्मचारी भवन येथे 50 बेडचे ऑक्सिजन युक्त कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. या सेंटरचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले. विशेष म्हणजे, राज्यातील ही पहिली जिल्हा परिषद आहे, जिने कोविड केअर सेंटर सुरू केले असल्याचा दावा वंचित ने केला आहे.
अकोला जिल्हा परिषदेने सुरू केले 50 खाटांचे कोविड काळजी केंद्र
अकोला जिल्हा परिषदेने 50 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. या सेंटरचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले.
कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणेवर ताण येत आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालयात अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अकोला ही 50 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करेल, असे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले होते. त्यानुसार त्यांनी या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे केले.
या कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावित्रीबाई राठोड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण आदी उपस्थित होते. या केअर सेंटरमुळे प्राथमिक लक्षणे असलेल्या रुग्णांना फायदा होईल, असा आशावाद व्यक्त करत हे सेंटर अधिक सक्षम करण्यासाठी दानशूर व्यक्तींनी यासाठी मदत करावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
हे कोविड सेंटर दोन तीन दिवसांत कार्यान्वित करण्यात आले आहे. याठिकाणी ऑक्सिजन व्यवस्था राहणार आहे. औषध देऊन येथे उपचार करण्याची व्यवस्था येथे राहणार आहे. राज्यातील ही पहिली जिल्हा परिषद आहे, जिने कोविड सेंटर सुरू केले असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीने केला आहे.