अकोला - वेधशाळेने चक्रीवादळाचा इशारा दिल्यानंतर मंगळवारी (दि. 2 जून) दिवसभर ढगाळ वातावरण होते. रात्री साडेआठ नंतर वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. तसेच जिल्हा प्रशासनाकडूनही सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
निसर्ग चक्रीवादळाचा इशारा देशभरामध्ये देण्यात आलेला आहे. महाराष्ट्रालाही याचा मोठा फटका बसणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या चक्रीवादळाचा फटका मराठवाडा आणि विदर्भालाही बसणार असल्याची शक्यता आहे.
मंगळवारी रात्री झालेल्या जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान वेधशाळेने दिल्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आपत्ती व्यवस्थापनासह सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. या चक्रीवादळामुळे जर नुकसान झाले तर त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या आहेत.