अकोला - संचारबंदीतील मर्यादीत शिथिलीकरणानंतर घालून दिलेल्या अटीशर्तींच्या अधिन राहून जिल्ह्यात १२२ कारखाने (उद्योग एकके) सुरू करण्यास परवानगी आज देण्यात आली आहे. यापूर्वी परवानगी असलेले अन्न प्रक्रिया व कृषी आधारीत ३२८ उद्योग सुरू होते.
अकोल्यात उद्योगाची चाके गतिमान; १२२ कारखाने सुरू करण्यास परवानगी
अकोल्यात संचारबंदी शिथिल केल्यानंतर औद्योगिक वसाहतीतील उद्योग सुरू करण्याबाबतचे निर्बंध शिथील करण्यात आले. त्यानुसार उद्योजकांनी जिल्हा प्रशासनाकडे परवानगीसाठी अर्ज दाखल केले होते. यासाठी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता यांचेकडून प्राप्त अहवालानुसार, जिल्ह्यात १४१ जणांची उद्योग सुरू करण्याची परवानगी मागितली होती. त्यातील १९ जणांना परवानगी नाकारण्यात आली असून १२२ जणांना परवानगी देण्यात आली आहे.
जिल्ह्यात संचारबंदी शिथिल केल्यानंतर औद्योगिक वसाहतीतील उद्योग सुरू करण्याबाबतचे निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यानुसार उद्योजकांनी जिल्हा प्रशासनाकडे परवानगीसाठी अर्ज दाखल केले होते. यासाठी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता यांचेकडून प्राप्त अहवालानुसार, जिल्ह्यात १४१ जणांची उद्योग सुरू करण्याची परवानगी मागितली होती. त्यातील १९ जणांना परवानगी नाकारण्यात आली असून १२२ जणांना परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या तसेच अन्न प्रक्रिया व कृषी उत्पादन आधारीत उद्योगांचे ३२८ उद्योग सुरूच होते. त्यात ३ हजार ४१२ कामगार कार्यरत आहेत, अशी माहिती कार्यकारी अभियंत्यानी दिली. या सर्व उद्योगात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना करून कामकाज करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.