महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोला सायकल ग्रुपची 'रविवारची सायकल वारी' देते उत्साह - akola cycle swari

अकोल्यात गेल्या चार महिन्यांपासून दर रविवारी सायकल वारी सुरू झाली आहे. दोनचार जणांच्या सोबतीने सुरू झालेल्या या 'रविवारची सायकल वारीला' व्यापक स्वरुप प्राप्त झाले आहे.अकोला सायकल ग्रुप असे या ग्रुपचे नाव पडले आहे. दर रविवारी शहराच्या जवळपास वीस ते तीस किलोमीटर सायकल चालवून त्या ठिकाणावरुन दुपारी बारापर्यंत परत येण्याचा हा त्यांचा नित्यक्रम ठरला आहे.

'रविवारची सायकल वारी
'रविवारची सायकल वारी

By

Published : Jan 18, 2021, 10:43 AM IST

अकोला - अकोल्यात गेल्या चार महिन्यांपासून दर रविवारी सायकल वारी सुरू झाली आहे. दोनचार जणांच्या सोबतीने सुरू झालेल्या या 'रविवारची सायकल वारीला' व्यापक स्वरुप प्राप्त झाले आहे. दर रविवारी वेगवेगळी थीम आणि ऊर्जा घेऊन शहराच्या वीस ते तीस किलोमीटरपर्यंत जाऊन हे सायकल स्वार आठवड्यातील थकवा दूर करत आहेत. शरीराला व्यायाम मिळावा तसेच पर्यावरण संतुलनात आपला सहभाग असावा, या उद्देशाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, शहर उपविभागीय पोलिस अधीक्षक सचिन कदम यांनी दर रविवारी सायकल चालवण्याचा उपक्रम सुरू केला. त्यांच्या या छोट्या ग्रुपला अवघ्या चार महिन्यांत शेकडो सायकलस्वार जोडले गेले.

सुरक्षित सायकल स्वारी
दर रविवारी सायकल ग्रुप पहाटे सहा वाजता एकत्र येऊन निर्धारित ठिकाणाकडे सायकलने कूच करतात. सुरक्षितरित्या आणि संयमाने सायकल चालवून सायकलस्वार निर्धारित स्थानावर अवघ्या एक ते सव्वा तासांमध्ये पोहोचतात. विशेष म्हणजे गेल्या चार महिन्यात त्यांच्यामध्ये सोबत असलेल्या एकाही सायकलला कुठलीही इजा झाली नाही.

अकोला सायकल ग्रुपची 'रविवारची सायकल वारी' देते उत्साह
'अकोला सायकल ग्रुप'अकोला सायकल ग्रुप असे या ग्रुपचे नाव पडले आहे. दर रविवारी शहराच्या जवळपास वीस ते तीस किलोमीटर सायकल चालवून त्या ठिकाणावरुन दुपारी बारापर्यंत परत येण्याचा हा त्यांचा नित्यक्रम ठरला आहे. युवकांचा ही मोठा सहभागगेल्या चार महिन्यांपासून अकोला सायकल ग्रुपमध्ये युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग वाढला आहे. तसेच काही महसूल विभागातील कर्मचारी व पोलिस विभागाचे कर्मचारीही त्यांच्यासोबत असतात.अकोला सायकल ग्रुपचे सोशल मीडियावर पेजअकोला सायकल ग्रुपचे सोशल मीडियावर पेजही तयार करण्यात आले आहे. प्रिन्स जैन या युवकाने हे पेज तयार केले आहे. दर रविवारी ठरलेल्या ठिकाणीचे नाव, ठरलेली थीम यासह सायकल चालवताना विविध फोटो या सोशल मीडिया पेजवर अपलोड केल्या जातात. या सोशल मीडियाचे हजारो व्ह्यूवर्स झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details