महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोल्यात 12 जण पॉझिटिव्ह तर सात जणांनी केली कोरोनावर मात - अकोल्यात 12 जण पॉझिटिव्ह

अकोल्यामध्ये आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार ३८३ जणांपैकी १२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत, तर ३७१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

corona in Akola
अकोल्यात 12 जण पॉझिटीव्ह

By

Published : Jul 16, 2020, 7:03 PM IST

अकोला - कोरोना तपासणी अहवालात आज सकाळी 12 जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर सात जणांनी कोरोनावर मात केली. 383 जणांची तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये 371 जण निगेटिव्ह आले आहेत.

सकाळी प्राप्त अहवालात १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात १० पुरुष व दोन महिला आहेत. त्यात मूर्तिजापूर येथील सहा जण, अकोट येथील पाच, जेतवन नगर येथील एक याप्रमाणे रहिवासी आहेत. कोव्हिड केअर सेंटरमधून सात जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

*सकाळी प्राप्त अहवालानुसार*

*प्राप्त अहवाल-३८३

*पॉझिटिव्ह- १२

*निगेटीव्ह- ३७१

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटिव्ह अहवाल- १९३४+२१= १९५५

*मृत-९८ (९७+१)

*डिस्चार्ज- १६३७

*दाखल रुग्ण (अ‌ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)- २२०

ABOUT THE AUTHOR

...view details