अकोला - महाजनादेश यात्रा अकोल्यात पोहोचण्याच्या एक दिवस आधी सहा शेतकऱ्यांनी विष प्राशन करावे, यातून शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण केल्याचा दावा फोल ठरला, तर या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडे दादही मागाविशी वाटू नये, हे मुख्यमंत्र्यांचे अपयश आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी टि्वट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून जिल्हा दौऱ्यावर येण्यापूर्वी जिल्ह्यातील सहा शेतकऱ्यांनी विष प्राशन केल्याच्या घटनेनंतर त्यांनी हे ट्विट करून मुख्यमंत्री आणि भाजप सरकारच्या कामावरच आक्षेप घेतला आहे.
शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण केल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा फोल - अशोक चव्हाण
महाजनादेश यात्रा अकोल्यात पोहोचण्याच्या एक दिवस आधी सहा शेतकऱ्यांनी विष प्राशन करावे, यातून शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण केल्याचा दावा फोल ठरला, तर या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडे दादही मागाविशी वाटू नये, हे मुख्यमंत्र्यांचे अपयश आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी टि्वट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.
काँग्रेस नेते अशोक चव्हाण
मुख्यमंत्री यांनी राज्यभरात महाजनादेश यात्रा काढली आहे. या यात्रेच्या माध्यमातून ते राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी तसेच सामान्य नागरिक आणि बेरोजगारांसाठी भरपूर कामे केल्याचे यात्रेतून दाखवित आहेत. मात्र, त्यांच्या यात्रेच्या एक दिवस आधी अकोल्यातील सहा शेतकऱ्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे अपयश जिल्ह्यात दिसून आल्याची टीका चव्हाण यांनी केली आहे.