अकोला -कोरोना काळात आणि अगदी संचारबंदीतही वाढदिवस साजरे करुन संकट ओढवून घेण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. मात्र, अकोल्यातील भारतीय दूरसंचार निगममध्ये(बीएसएनएल) अभियंता असलेल्या तरुणाने आगळ्या-वेगळ्या पद्धतीने आपल्या आईचा वाढदिवस साजरा केला आहे. त्यांनी आईच्या वाढदिवशी 50 गरजू लोकांना मदत केली. त्यांच्या या कार्याची दखल घेत महानगरपालिका स्थायी समिती सभापतींनी त्यांचा सत्कार करून कौतुक केले.
आगळ्या-वेगळ्या पद्धतीने केला आईचा वाढदिवस साजरा; 50 गरजुंना केली मदत - अकोला मदत न्यूज
कोरोना लॉकडाऊन काळात अनेकांच्या हाताचे काम गेले आहे. गरिबांना दोन वेळचे जेवण मिळण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. समाजातील अनेक लोकांनी या गरजुंना मदतीचा हात पुढे केला. बीएसएनएल कार्यालयामध्ये अभियंता म्हणून काम करणाऱ्या नंदू देवकते यांनी अशा पन्नास व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले. यासाठी त्यांनी आईच्या वाढदिवसाचे निमित्त शोधले.
![आगळ्या-वेगळ्या पद्धतीने केला आईचा वाढदिवस साजरा; 50 गरजुंना केली मदत Nandu Devakate](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7615317-181-7615317-1592143455697.jpg)
कोरोना लॉकडाऊन काळात अनेकांच्या हाताचे काम गेले आहे. गरिबांना दोन वेळचे जेवण मिळण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. समाजातील अनेक लोकांनी या गरजूंना मदतीचा हात पुढे केला. बीएसएनएल कार्यालयामध्ये अभियंता म्हणून काम करणाऱ्या नंदू देवकते यांनी अशा पन्नास व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले. यासाठी त्यांनी आईच्या वाढदिवसाचे निमित्त शोधले.
कुठलाही गाजावाजा न करता नंदू देवकते यांनी हा उपक्रम केला. याची माहिती परिसरातील नागरिकांनी मनपा स्थायी समिती सभापती सतीश ढगे, शिवनगर गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष किशोर फुंडकर यांना दिली. त्यांनी देवकते यांचा सत्कार करून कौतुक करण्याचा निर्णय घेतला. शेकडो व्यक्तींना मोफत कापडी मास्क तयार करून वाटणाऱ्या डिंपल कवडे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. या दोघांच्याही कार्याला कौतुकाची थाप मिळाल्याने त्यांचा उत्साह वाढला आहे. यावेळी किरण जोशी, कमलेश भरणे, पिंटू देशमुख, रुपेश वानखडे, प्रशांत रेलकुंटवार, प्रमोद कवडे, आनंद जागीदार, सतीश नवथळे यांच्यासह परिसरातील काही नागरिक उपस्थित होते.