महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Govardhan Sharma Passed Away : सच्चा रामभक्त गमावला, आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन - आमदार गोवर्धन शर्मा

Govardhan Sharma Passed Away : अकोला पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार गोवर्धन शर्मा यांचं कर्करोगामुळे निधन झालं. ते गेल्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. सामाजिक क्षेत्रात अथक कार्य करणारे रामभक्त म्हणून त्यांची ओळख होती.

Govardhan Sharma
Govardhan Sharma

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 3, 2023, 9:50 PM IST

Updated : Nov 4, 2023, 7:04 AM IST

आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन

अकोलाGovardhan Sharma Passed Away :अकोलापश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार गोवर्धन शर्मा यांचं शुक्रवारी (३ नोव्हेंबर) निधन झालं. ते कर्करोगानं ग्रस्त होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर राहत्या घरी उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. शनिवार, ४ नोव्हेंबर रोजी शहरातील अन्नपूर्णा माता मंदिराजवळ त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत.

सामाजिक क्षेत्रात अमूल्य योगदान :अकोल्यातील श्रीराम नवमी शोभायात्रा समितीच्या माध्यमातून त्यांनी सातत्यानं सामाजिक कार्यात सहभाग घेतला. त्यांनी मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणूनही काम केलंय. त्यांच्या पश्चात पत्नी गंगादेवी शर्मा, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांनी रामदेवबाबा, शामराव मंदिर, सालासर हनुमान मंदिराचे विश्वस्त म्हणूनही काम केलंय. पश्चिम विदर्भातील ब्राह्मण समाजाला एकत्र करण्याचं कामही त्यांनी केलं होतं. धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी अमूल्य योगदान दिलंय.

राम जन्मभूमी आंदोलनात सक्रिय सहभाग होता : गोवर्धन शर्मा यांचा श्रीराम जन्मभूमी आंदोलनात सक्रिय सहभाग होता. त्यांनी अकोल्यातील पाणीटंचाई संदर्भात महत्त्वपूर्ण काम केलंय. गोवर्धन शर्मा यांनी अकोला नगरपालिकेचे पाणीपुरवठा सभापती, नियोजन समिती सदस्य तसेच नियोजन सभापती म्हणून काम केलं आहे. त्यांच्या निधनाचं वृत्त कळताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

गोवर्धन शर्मा यांच्या निधनानं माझा ज्येष्ठ सहकारी, एक पक्षनिष्ठ, ध्येयवादी नेता गमावला. पक्षाची ही अपरिमित हानी आहे. नगरसेवक, आमदार, राज्यमंत्री आदी विविध जबाबदार्‍यांमधून त्यांनी जनतेची सेवा केली. शिक्षण, सामाजिक क्षेत्रात त्यांनी दिलेलं योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनानं एक सच्चा रामभक्त आम्ही गमावला आहे. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम :अत्यंत धार्मिक आमदार म्हणून गोवर्धन शर्मा सर्वांना परिचित होते. त्यांची ओळख मोबाईल फोन न वापरणारे नेते म्हणून होती. त्यांच्याकडं मोबाईल फोन, डायरी नसतानाही अनेकांचां संपर्क क्रमांक शर्मा यांना तोंडीपाठ होता. पांढरा कुर्ता-पायजमा हा त्यांचा आवडता पोशाख होता. अकोला नगरपालिकेत त्यांनी नियोजन सभापती म्हणूनही काम पाहिलंय. अकोला शहरातील पाणीटंचाईबाबत त्यांनी महत्त्वाचं काम केलं होतं. नगरसेवक कसा असावा याचा आदर्शही त्यांनी घालून दिला होता. त्यांनी जुन्या शहरात शैक्षणिक संस्था उभारून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहन केलं होतं. तसंच त्यांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या होता. सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम शर्मा यांनी केलंय. अकोलेकरांच्या आनंदात सहभागी होऊन नेहमी मदतीचा हात देणारे गोवर्धन शर्मा हे सामाजिक क्षेत्रात सातत्यानं कार्यरत होते. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. संकटसमयी नागरिकांच्या मदतीला ते धावून जात असत.

राज्यातील राजकारणात पोकळी निर्माण : अकोला हा नेहमीच भाजपसाठी अनुकूल मतदारसंघ मानला जातो. या मतदारसंघात गोवर्धन शर्मा यांनी गेल्या 25 वर्षात भारतीय जनता पक्षाचा दबदबा निर्माण केला होता. शर्मा यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या फरकानं विजय मिळवला होता. गोवर्धन शर्मा यांनी मतदारसंघात आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार गोवर्धन शर्मा यांना 66 हजार 934 मते मिळाली होती. 2019 मध्ये शर्मा यांना 70 हजार 291 मते मिळाली होती. पक्षाचं भक्कम जाळं निर्माण करण्यात गोवर्धन शर्मा यांचा हातकंडा होता. त्यांच्या निधनानं राज्यातील राजकारणात पोकळी निर्माण झालीय.

हेही वाचा -

  1. Manoj Jarange Patil Z Plus Security : मनोज जरांगे पाटलांना 'झेड प्लस' सुरक्षा देण्याची मराठा समाजाची माणगी; नितेश राणेंचंही पत्र
  2. NCP Disqualification Case : मोहम्मद फजल, श्रीनिवास पाटील यांच्या अपात्रतेसाठी अजित पवार गटाची याचिका
  3. Manoj Jarange Patil Painting: 'देवमाणूस' म्हणत चित्रकार प्रदीप शिंदेंनी स्वतःच्या रक्ताने रेखाटले मनोज जरांगे पाटलांचे चित्र...
Last Updated : Nov 4, 2023, 7:04 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details