अकोला- संचारबंदीमध्येही 24 तास सेवा देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न कोरोना विषाणूमुळे निर्माण झाला आहे. या विषाणूग्रस्त व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या पोलिसांना या विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना सॅनिटायझर, हँड ग्लोब्ज व मास्कचे वितरण करण्यासाठी जिल्हा बियर बार असोसिएशन समोर आली आहे. या असोसिएशनतर्फे पोलिसांना सुरक्षित साहित्याचे वितरण करण्यात आले. त्यासोबतच पोलिसांचेही त्यांनी आभार मानले.
अकोल्यात पोलिसांसाठी सॅनिटायझर, हँड ग्लोव्ह्ज, मास्कचे वितरण
संचारबंदीमध्येही 24 तास सेवा देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न कोरोना विषाणूमुळे निर्माण झाला आहे. या विषाणूग्रस्त व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या पोलिसांना या विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे.
संचार बंदीच्या काळामध्ये एक काठी घेऊन रस्त्यावर भर उन्हात पोलीस आपले कर्तव्य बजावीत आहेत. संसर्ग होणाऱ्या विषाणूचा कुठल्याही वैद्यकीय साहित्यविना दोन हात करण्यासाठी पोलिस घाम गाळत आहे. या विषाणूचा संसर्ग होऊ नये, म्हणून त्यांच्याकडून खबरदारी घेतली जात असली तरी त्या अपुऱ्या आहेत. कुठल्याही सुरक्षेच्या किटविना ते या विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीपासून स्वतः व इतरांना दूर राहण्यासाठी कर्तव्य बजावीत आहेत. असुरक्षित असलेल्या पोलिसांना मात्र सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक ते साहित्य देण्याच्या उद्देशाने जिल्हा बिअर बार असोसिएशन सरसावली आहे.
या असोसिएशनने पोलिसांना सॅनिटायझर, हँड ग्लव्ज, मास्कचे वितरण केले. विशेष म्हणजे, ही असोसिएशन शहरातील संपूर्ण पोलिस ठाण्यांमध्ये जाऊन प्रत्येक कर्मचार्याला त्यांनी सुरक्षित ठेवण्याचे साहित्य वितरीत केले. त्यामुळे पोलिसांनीही या असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. तर नागरिक सुरक्षित रहावे, म्हणून असुरक्षित राहून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांचेही जिल्हा बियरबार असोसिएशनचे पदाधिकारी श्रीकांत देशमुख, अतुल पवनीकर, संतोष अग्रवाल, राजेश गोसावी, प्रवीण चोपडे, नितीन शहाकार, अवि रामधणी आदींनी आभार व्यक्त केले.